पोलिसांनीच पोलिसांच्या गाड्यांमधील डिझेल चोरी केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शिवाय डिझेलची चोरी करणं पोलिसांना चांगलचं महागात पडलं आहे. कारण २५० लिटर डिझेलपायी तीन पोलिसांना निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. ही विचित्र घटना मध्य प्रदेशातील भिंड येथे घडली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पोलिसांनी आपल्याच विभागाच्या वाहनातून डिझेल चोरी केल्याची घटना राखीव निरीक्षक कार्यालयाबाहेर घडली आहे. या कार्यालयाबाहेर काही वाहने लावण्यात आली होती. त्यापैकी ६ वाहनांतील जवळपास २५० लिटर डिझेल चोरलं गेलं. या चोरीच्या घटनेती माहिती अधिकार्‍यांना कळताच शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला, त्यानंतर एसपींनी याप्रकरणी तीन पोलिसांना निलंबित केले.

हेही वाचा- माथेफिरु प्रेमीने विवाहितेच्या घरी पाठवली रुग्णवाहिका; पोलिसांनाही गंडवलं; जाणून घ्या काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबरच्या रात्री राखीव निरीक्षक कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या पोलिसांच्या गाड्यांमधील डिझेल मोजण्यात आलं होतं. दुसऱ्यादिवशी सकाळी या गाड्या बाहेर काढण्याआधी पुन्हा या सर्व वाहनांमधील डिझेल मोजलं असता. ६ गाड्यांमधील २५० डिझेल कमी झाल्याचं पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आलं.

हेही वाचा- घोर कलियुग! मुलीचं लग्न १० दिवसांवर येऊन ठेपलं अन् आई प्रियकरासोबत पळाली, जाताना मुलीचे दागिनेही घेऊन गेली

चक्क पोलिसांच्या गाडीतली डिझेलची चोरी झाल्याची घटना उघडकीस येताच सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पोलिस लाईनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांमधून डिझेल चोरण्यात त्यांच्याच विभागातील काही पोलीसांचा हात असल्याचे तपासात समोर आल आहे. धक्कादायक बाब म्हणजे या चोरीच्या घटनेचा सखोल तपास केला असता. यामध्ये काही पोलिसांची नावे समोर आली आहेत.

हेही वाचा- कर्म तैसे फळ! रस्त्याने निघालेल्या म्हशीला लाथ घातली आणि करुन घेतली स्वत:ची फजिती

दरम्यान, ज्या पोलिसांची नावं या चोरीच्या प्रकरणामध्ये आहेत त्या सर्व आरोपी पोलिसांना एसपी शैलेंद्र सिंह कुशवाह यांनी तत्काळ प्रभावाने निलंबित केले असून निलंबित केलेल्यांमध्ये पोलीस शिपाई अभिनेंद्र सिकरवार, शिवा शर्मा आणि संदीप यांना भिंडच्या एसपींनी निलंबित केले आहे. या प्रकरणाची माहिती देताना सीएसपी निशा रेड्डी यांनी सांगितले की, “आत्तापर्यंत 3 जणांना निलंबित केले असून डिझेल चोरी प्रकरणाची कारवाई अजून सुरू आहे. तसंच डिझेल चोरीची तक्रार आल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी प्रकरणात सहभागी असणाऱ्यांना तिघांना निलंबित केलं आहे.”

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Policemen stole 250 liters of diesel from police vehicles in mp jap
First published on: 06-12-2022 at 17:20 IST