वडिलांची सेकेंड हॅंड सायकल पाहून आनंदाने उड्या मारू लागला चिमुकला, पाहा हा VIRAL VIDEO

कोणी करोडोंची कार घरी आणल्यावर आनंदी होतो तर कोणी एक साधी सेकेंड हॅंड सायकल घरी आली की आनंदी होतो आणि हा क्षण त्यांच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण बनून जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

Kid-Video-Viral
(Photo: Twitter/ AwanishSharan )

Father Son Emotional Video: जगात वेगवेगळ्या स्वभावाची माणसं असतात. काही लोकांच्या जगण्यासाठीच्या अपेक्षा इतक्या असतात की त्या कधी संपण्याचं नाव घेत नाहीत. काही लोक असेही असतात जे अगदी छोट्यातल्या छोट्या गोष्टीतही ते त्यांच्या आनंद शोधत असतात. म्हणून माणूस त्याच्या गरजेनुसारच त्याला हव्या असणाऱ्या गोष्टी निवडत असतो. कोणी करोडोंची कार घरी आणल्यावर आनंदी होतो तर कोणी एक साधी सेकेंड हॅंड सायकल घरी आली की आनंदी होतो आणि हा क्षण त्यांच्या आयुष्यातला सर्वात अविस्मरणीय क्षण बनून जातो. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनलाय. वडिलांनी आणलेली सेकेंड हॅंड सायकल पाहून या व्हिडीओमधला चिमुकला इतका आनंदी होतो की जणू काही त्याला जगातली सर्वात शानदार वस्तू मिळाली. हा व्हिडीओ पाहाताना तुम्ही भावूक व्हाल हे मात्र नक्की.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका गरीब कुटूंबातील वडील त्यांच्या घरी सेकेंड हॅंड सायकल आणतात. घरी सेकेंड हॅंड सायकल आल्यानंतर संपूर्ण कुटूंबियांनी तिची पूजा सुद्धा केली. ज्यावेळी वडील आपल्या सायकलला हार घालतात त्यावेळी त्यांचा मुलगा आनंदाने उद्या मारू लागतो. टाळ्या वाजवू लागतो. त्यानंतर बाप-लेक दोघे मिळून नव्या सायकलच्या पाया पडतात. आपल्या मुलाचा हा आनंद पाहून वडिलांच्या चेहऱ्यावर सुद्धा समाधानाचे भाव झळकू लागले होते.

आणखी वाचा : नवरीसमोरच केलं असं काही की खवळला नवरदेव; स्टेजवरच सुरू झाली मारामारी, पाहा VIRAL VIDEO

हा मनमोहक व्हिडीओ छत्तीसगड कॅडरचे आयएएस अधिकारी अवनीश चरण यांनी ट्विटरवर शेअर केलाय. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी एक कप्शन देखील लिहिली आहे. ‘ही केवळ एक सेकेंड हॅंड सायकल नव्हे तर त्यांच्यासाठी जगातला सर्वात मोठा आनंद आहे. या चिमुकल्याचा आनंद इतका होता की जणू काही त्याच्या घरी एखादी मर्सिडीज कार आलेली असावी. ‘ अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे.

आणखी वाचा : Leopard Attack Video: हरणासाठी बिबट्या बनला ‘दगड’, हुशारीने शिकार करायची होती; मग काय झालं, पाहा VIRAL VIDEO

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : दोन तरूणांमध्ये जबरदस्त फाईट, एकाने कानशिलात मारली तर तर दुसऱ्याने एका बुक्कीत केलं गारद, पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ लोकांना खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तो सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करण्याचा मोह मात्र लोकांना आवरता येत नाहीय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला आठ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत तर ७७ हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. हा व्हिडीओ पाहून लोक भावूक होत यावर आपल्या वेगवेगळ्या भावना व्यक्त करत आहेत.

एका युजरने कमेंट करताना लिहिलं की, “याला म्हणतात समाधान…कोणताच हॅपिनेस इंडेक्स याचं मोजमाप करू शकत नाही.” तर आणखी एका दुसऱ्या युजरने लिहिलं की, “काही गोष्टी पाहूनच खऱंच खूपच आनंद होतो.” अशा अनेक प्रतिक्रियांचा जणू पाऊसच या व्हिडीओवर पडलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Poor father brought home a second hand cycle his kid start enjoying video viral prp

Next Story
दोन तरूणांमध्ये जबरदस्त फाईट, एकाने कानशिलात मारली तर तर दुसऱ्याने एका बुक्कीत केलं गारद, पाहा हा VIRAL VIDEO
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी