प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि जलद होण्यासाठी मुंबईसह पुणे, बंगळुरूसह अनेक शहरांमध्ये मेट्रो सेवा सुरू करण्यात आली आहे. या मेट्रोशी संबंधित अनेक व्हिडीओ रोज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. सध्या बंगळुरू मेट्रो स्थानकातील असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुम्हालाही प्रश्न पडेल की, मेट्रो सर्वांसाठी आहे की फक्त व्हीआयपींसाठी? कारण- व्हिडीओत एका वृद्ध व्यक्तीला मेट्रो स्थानकातील सुरक्षा रक्षक कपडे मळलेले असल्याने जाण्यापासून रोखत असल्याचे दिसतेय. बेंगळुरूमधील राजाजीनगर मेट्रो स्टेशनवर रविवारी ही घटना घडली.

हा वृद्ध गृहस्थ उत्तर भारतातून बेंगळुरूमध्ये काम करण्यासाठी आला होता; जो शेतकरी असल्याचे सांगण्यात येत आहे. पण, त्याचे कपडे मळकट असल्यामुळे तिकीट असूनही सुरक्षा रक्षकाने त्याला प्लॅटफॉर्मवर जाण्यापासून रोखले. हा सर्व प्रकार पाहून कार्तिक नावाच्या एका व्यक्तीने याला विरोध करीत वृद्धाच्या बाजूने सुरक्षा रक्षकाशी वाद घालण्यास सुरुवात केली.

Saving
बचत फक्त मोठ्यांनी नाही, लहानांनीही करावी! मुलांना अर्थसाक्षर बनवण्यासाठी ‘या’ गोष्टी ठरतील फायदेशीर
bmrcl
मळलेले कपडे, तुटलेली शर्टाची बटणं पाहून तरुणाला मेट्रोतून प्रवास करण्यापासून रोखलं, बंगळुरू मेट्रोची असंवेदनशीलता
Thief snatches mangalsutra of woman when she was busy in making reels
धक्कादायक! भरदिवसा रस्त्यावर रिल करणाऱ्या महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरट्यांनी नेले ओढून, Video व्हायरल
how to control blood sugar on the occasion of holi
Blood Sugar : होळीला गोड खाताना रक्तातील साखर कशी नियंत्रणात ठेवावी? वाचा, तज्ज्ञ काय सांगतात…

मुंबईत धावत्या लोकलमध्ये तरुणीचा अश्लील डान्स; VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप; म्हणाले, “गांभीर्य ओळखून…”

व्हिडीओमध्ये सुरक्षा कर्मचारी कार्तिकला असे म्हणताना ऐकू येत आहे की, असे घाणेरडे कपडे घातलेल्या या वृद्धाला प्रवास करण्याची परवानगी दिली, तर इतर प्रवासी आक्षेप घेऊ शकतात. त्यानंतर कार्तिकने मेट्रो हे साधन केवळ व्हीआयपी लोकांसाठी आहे की सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी, असा प्रश्न विचारला. त्यानंतर तो कपड्यांच्या आधारे प्रवास करण्यास परवानगी देण्याबाबत कोणता लेखी आदेश आहे तो त्याने दाखविण्यास सांगितले; ज्यावर सुरक्षा रक्षकांकडे उत्तर नव्हते. त्यानंतर त्या वृद्धाला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. हे प्रकरण शिगेला गेल्यावर बीएमआरसीएलने कारवाई करीत सुरक्षा पर्यवेक्षकाला निलंबित केले. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पण, या व्हिडीओतील सुरक्षा रक्षकांच्या वागण्यावर आता अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच त्या वृद्ध व्यक्तीला दिलेली वागणूक फार अन्यायकारक असल्याचे मतही अनेकांनी मांडले आहे.