सध्या अमेरिकेच्या गुप्तचर संस्थेकडून एका UFO रेकॉर्डींगची तपासणी सुरु करण्यात आली आहे. जे इराकच्या मोसुल शहरावर उडणाऱ्या एका गोलाकार धातूचे आहे. या गोलाकार धातुचा एक फोटोही प्रसारीत करण्यात आला आहे. जो उत्तर इराकमधील टोही विमानाने १६ एप्रिल २०१६ कॅप्चर केलेल्या चार-सेकंदांच्या व्हिडिओमधून घेण्यात आला होता. याबाबत यूएफओ संशोधक जेरेमी कॉर्बेल आणि पत्रकार जॉर्ज नॅप यांनी त्यांच्या नवीन पॉडकास्ट “वेपनाइज्ड” च्या पहिल्या भागात ही दृश्य दाखवली आहेत.

त्यांनी या पॉडकास्टमध्ये, यूएसच्या अधिकाऱ्यांनी एलियन स्पेसक्राफ्टचे फुटेज पकडल्याचा विश्वास व्यक्त केल्याचं सांगितलं आहे. अमरिकेच्या गुप्तचर विमानाच्या बाजूने धावणाऱ्या धातूसारख्या बॉलची अमेरिकेच्या लष्करी आणि गुप्तचर समुदायाकडून चौकशी केली जात असल्याचंही “वेपनाइज्ड” च्या पहिल्या भागात सांगण्यात आलं आहे.

Viral Video The Air India staff who loads the luggage on the plane throws passenger musical instruments
धक्कादायक! सामान विमानात चढवताना प्रवाशाचे वाद्य दिलं फेकून; एअर इंडियाच्या कर्मचाऱ्यांचा ‘हा’ VIDEO पाहाच
due to events of previous years causes global warming
गतवर्षांतील घटनांमुळे जागतिक तापमानवाढीला दुजोरा; ‘अ‍ॅडव्हान्सेस इन अ‍ॅटमॉस्फेरिक सायन्स’च्या अभ्यास अहवालाचा निष्कर्ष
Share Market
Stock Market Opening Bell : मतदानाच्या पहिल्या टप्प्यात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्स-निफ्टीची नकारात्मक सुरुवात
Sensex eight hundredth retreat due to concerns over US inflation protracted tariff cuts
अमेरिकेतील महागाई, लांबलेल्या दरकपातीच्या चिंतेने ‘सेन्सेक्स’ची आठ शतकी माघार

हेही पाहा- पृथ्वीवरून पाकिस्तान गायब? Viral Photo पाहून नागरिक म्हणतात, “आझादीसाठी हट्ट सोडून..”

चित्रपट निर्माते जेरेमी कॉर्बेल आणि पत्रकार जॉर्ज नॅप, यांनी “UFO”च्या ज्या फोटोवर चर्चा केली ते पेंटागॉनच्या अज्ञात एरियल फेनोमेना टास्क फोर्सने तयार केलेले आहे. शिवाय ते आता मोसुल ऑर्ब म्हणून ओळखले जाते, कारण एप्रिल २०१६ मध्ये उत्तर इराकवरून उडताना दिसले होते. कॉर्बेल आणि नॅप सांगतात की, ही इमेज अमेरिकन अधिकार्‍यांसाठी वर्गीकृत ब्रीफिंगचा भाग म्हणून प्रसिद्ध करण्यात आली होती. मात्र आता त्यांना ते दृश्य त्यांच्या दर्शकांसोबत शेअर करायचे होते.

हेही पाहा- आनंद महिंद्रा यांनी ट्विट केला हवेत उडणाऱ्या बाईकचा Video; म्हणाले, “जगभरातील पोलीस दलात…”

शिवाय त्याला मोसुल ऑर्ब का म्हणतात ते देखील त्यांनी या पॉडकास्टच्या पहिल्या भागात स्पष्ट केलं आहे. त्यांनी सांगितलं की ही उत्तर इराकमध्ये घेतलेली इमेज आहे त्यामुळे तिला मोसुल ऑर्ब असं म्हणतात. सध्या प्रसारीत करण्यात आलेला फोटो हा अनेक फोटोंपैकी एक असून तो प्रत्यक्षात एका व्हिडिओमधील आहे. या घटनेचा एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये ४ सेकंद हा धातूसारखा दिसणारा बॉल एका गुप्तचर विमानाच्या बाजूने धावताना आणि विमानच्या बाजूला फिरताना दिसत आहे.

यानंतर नॅप एक फुटेज दाखवतो जे २०१९ मध्ये यूएसएस ओमाहा वरून घेतलेल्या रेकॉर्डिंगची आठवण करून देतो. त्यावेळी अशीच एक अज्ञात वस्तू नौदलाच्या जहाजाभोवती फिरताना आढळल्याचंही तो सांगतो. त्यावर कॉर्बेल सांगतो की, ‘हे मजेदार नाही का? यूएफओ अनेकदा चार मूलभूत आकारांमध्ये दाखवले जातात, जे गोलाकार, पिरॅमिड, क्यूब्स आणि सिगार सारखे असतात. अतिशय सामान्य आकारात असतात पूर्णपणे अॅरोडायनामिक नसतात. असं तो आपल्या पॉडकास्टमध्ये सांगत आहे. शिवाय लवकरच या माहितीबाबतचा दुसरा भागही प्रेषकांसाठी समोर आणणार असल्याचे त्याने म्हटलं आहे.