Viral Video: समाजमाध्यमांवर सध्या प्रँक करणाऱ्यांचा ट्रेंड वाढत चालला आहे. कधी रस्त्यावरून जाणाऱ्या अनोळखी व्यक्तींबरोबर, तर कधी ओळखीच्या किंवा अनोळखी व्यक्तीला कॉल, किंवा मसेज करून असे प्रँक केले जातात. असे प्रँक नेहमीच लोकांना खळखळून हसवतात; तर अनेकांना घाबरवतातही तर बऱ्याचदा या प्रँकमुळे प्रँक करणाऱ्या व्यक्तीला मारदेखील खावा लागतो. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जो पाहून नेटकरी अनेक कमेंट्स करताना दिसत आहेत.

एखाद्या सुंदर तरुणीने आपल्याशी संवाद साधावा, असे अनेक पुरुषांना वाटते. त्यासाठी ते समोरून अनेक प्रयत्नही करताना दिसतात. पुरुषांच्या मनातील या भावना त्याच्या जवळच्या मित्रांना खूप चांगल्या प्रकारे ठाऊक असतात. त्यामुळे मुद्दाम मित्राची मजा घेण्यासाठी ते प्रँक कॉल किंवा मेसेज करून आपल्याच मित्राची मजा घेण्याचा प्रयत्न करतात. आता असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय ज्यात एक पुरुष दुसऱ्या पुरुषाबरोबर मुलीच्या आवाजात गप्पा मारताना दिसतोय. त्यांचे हे संभाषण तुम्हाला पोट धरून हसवेल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक पुरुष कॉलवर बोलणाऱ्या पुरुषाबरोबर मुलीच्या आवाजात गप्पा मारतोय. यावेळी समोरून बोलणारा पुरुष त्याला “तुमचं हसणं इतकं सुंदर आहे म्हणजे तुम्ही किती सुंदर असाल…” असं म्हणतो. त्यावर मुलीच्या आवाजात बोलणारा पुरूष त्याला म्हणतो, “तुम्ही जर मला खरं खरं हसताना बघितलं, तर मोबाईल सोडून पळून जाल.” त्यानंतर मुलीच्या आवाजात बोलणाराला समोरच्याला, “तुम्ही बॅचलर राहता की फॅमिलीबरोबर राहता?” असं विचारतो. त्यावर तो, “मी बॅचलर राहतो”, असं सांगतो. त्यानंतर मुलीच्या आवाजात बोलणारा, “तुम्ही जेवण घरीच बनवता की मेसचं खाता?”, असं विचारतो. त्यावर तो, “बाहेरच खातो”, हे उत्तर देतो. त्यावर मुलीच्या आवाजात बोलणारा, “बाहेरचं जेवण चांगलं असतं का?”, असं विचारतो. त्यावर तो, “नाही ना; पण आपली मैत्री झाल्यावर तुमच्याकडे येईन” असं म्हणतो. त्यावर मुलीच्या आवाजात बोलणारा, “या कधीही. मला वांग्याचं भरीत खूप छान बनवता येतं, मी देईन तुम्हाला बनवून”, त्यावर समोरून बोलणारा पुरुष खूश होऊन, “हो हो मला खूप आवडते ते”, असं म्हणतो. असे हे विनोदी संभाषण पुढे काही वेळ चालू राहते.

व्हिडीओ पाहण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

या मजेशीर व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील @specialsajid या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला असून पाच दशलक्षांहून अधिक व्ह्युज आणि एक लाखाहून अधिक लाइक्स मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक युजर्स कमेंट्स करताना दिसत आहेत.

एकाने लिहिलंय, “४ वेळा हार्ट अटॅक येईल त्याला बघितल्यावर”, तर दुसऱ्याने लिहिलंय, “औरत का चक्कर बाबु भैया औरत का चक्कर”, तर तिसऱ्या युजरने लिहिलंय, “मुलींचासुद्धा एवढा मुलीसारखा आवाज नसतो. but बाप रे dengerous आहे हे”, तर आणखी एकाने लिहिलंय, “त्याच्या आयुष्याचे भरीत केलंस.”

Story img Loader