Viral Video : सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ आश्चर्यकारक असतात. कधी कोणी त्यांच्या आजूबाजूला घडणार्या घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करतात तर काही लोक मनोरंजनासाठी कंटेट तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करतात.
सध्या असाच एक मजेशीर व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने सँडविच विक्रेत्याबरोबर प्रँक केला आहे. हा प्रँक पाहून तुमच्याहा अंगावर काटा येईल. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. (prank viral video who made this sandwich a young guy shouted read what happened with sandwich seller)
या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला एक सँडविच दुकान दिसेल. तिथे अनेक ग्राहक दुकानासमोर लावलेल्या टेबलाजवळ उभे राहून सँडविच खात आहे. अचानक एक तरुण खूप जोराने ओरडतो आणि रागात विचारतो, “हे सँडविच कोणी बनवले? तेव्हा सँडविच विक्रेता घाबरत पुढे येतो आणि सांगतो, “मी हे सँडविच बनवले” त्यावर हा तरुण मजेशीरपणे म्हणतो, “काय सँडविच बनवले. मजा आली. काय फ्लेवर आहे. पुन्हा एक लावा” सँडविच विक्रेत्याच्या चेहऱ्यावरची भीती क्षणात दूर होते आणि चेहऱ्यावर हसू येते. विक्रेत्याच्या चेहऱ्यावरील हसू पाहून तुमच्याही चेहऱ्यावर हसू येईल. सध्या हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
food.airdrop या इन्स्टाग्राम अकाउंट वरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये लिहिलेय, ” सँडविच स्पेशल” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, ” दुकान विक्रेत्याचा जीव घेतोस का मित्रा?” तर एका युजरने लिहिलेय, “बिचारा भाऊ पैसे परत देण्याच्या विचारात त्याच्याकडे आला असेल” आणखी काही युजरने लिहिलेय, “असं कोण बोलते देवा आईशप्पथ!” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी हसण्याची इमोजी शेअर केले आहेत. खूप लोकांना या तरुणाचा प्रँक आवडला आहे.
यापूर्वी सुद्धा असे अनेक प्रँकचे व्हिडीओ समोर आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका तरुणाने पुणेकर काकांबरोबर प्रँक केला होता पण शेवटी असं काही घडलं की तरुणाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. तो भावुक झाला होता. त्यावेळी तो व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला होता.