दिल्लीत विद्यार्थ्यांनी मिळून एका गरोदर श्वानाची निदर्यीपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हे सर्व विद्यार्थी ओखला येथील डॉन बॉस्को टेक्निकल इन्स्टिट्यूचे विद्यार्थी असल्याचा संशय आहे. विद्यार्थ्यांनी आधी श्वानाचा छळ केला आणि नंतर तिचा मृतदेह शेतातून फरफटत नेला. हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हिडीओमध्ये विद्यार्थी कॉलेजच्या आवारात असणाऱ्या एका शेडच्या शेजारी श्वानाला घेरताना दिसत आहेत. यावेळी एक विद्यार्थी हातामध्ये दांडकं घेऊन उभा असल्याचं दिसत आहे. दरम्यान इतर विद्यार्थी त्याला श्वानाला मारुन टाकण्यासाठी उसकवत आहेत.

यानंतर एक विद्यार्थी मृत श्वानाला शेतातून फरफटत नेतो आणि फेकून देतो. घटनेता व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्राणीप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहेत.

न्यू फ्रेंड्स कॉलनी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून तपास करत आहेत. तक्रारीत देण्यात आलेल्या माहितीनुसार, वरिष्ठ कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार संस्थेतील दोन भाऊदेखील उपस्थित होते.

पिपल फॉर अॅनिमल संस्थेच्या विश्वस्त अंबिका शुक्ला यांनी म्हटलं आहे की “आई होणाऱ्या श्वानाची हत्या करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांनी दाखवेली क्रूरता भयानक आहे. त्यांची संस्थेतून हकालपट्टी केली पाहिजे आणि कायद्यानुसार कडक कारवाई केली पाहिजे”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pregnant street dog beaten to death in delhi by students sgy
First published on: 20-11-2022 at 14:03 IST