Viral Dance Of Mother On Her Baby Shower: आई होण्याचा क्षण हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील सर्वात खास क्षणांपैकी एक असतो. बाळाच्या आगमनाची चाहूल लागताच घरात आनंदाचं वातावरण तयार होतं. पण या आनंदाची खरी झलक कधी कधी आईच्या चेहऱ्यावरच्या excitementमध्ये दिसून येते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका गोड क्षणाची चर्चा रंगली आहे.

व्हायरल झालेल्या या रीलमध्ये आईचा उत्साह आणि बाळाच्या आगमनाची आतुरता पाहायला मिळते. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद इतका खास आहे की, हा क्षण पाहून नेटकऱ्यांच्याही चेहऱ्यावर हसू येत आहे. इतर वेळी तर कोणीही भन्नाट नाचू शकेल, पण गरोदरपणात इतक्या सहजतेने नाचताना तुम्ही कुणाला पाहिलंय का?

या व्हिडीओमध्ये डोहाळ जेवणाच्या दिवशी होणारी आई अगदी बेधुंद होऊन आनंदात नाचताना दिसत आहे. अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या ‘हमको आज कल है इंतजार’… या गाण्यावर या आईने बाळासाठी खूप गोड डान्स केला आहे. आईचा हा उत्साह पाहून पोटातल्या बाळालाही खूप मजा आली असेल यात वादच नाही.

आईची ही excitement पाहून आता सगळ्यांना एकच प्रश्न पडला आहे की, आई एवढी excited असेल, तर पोटातलं बाळ किती excited असेल?

आई आणि बाळामधील नातं हे बाळाच्या जन्माआधीच तयार होतं, असं म्हटलं जातं. बाळाच्या प्रत्येक हालचालीसोबत आईचा आनंद, उत्सुकता आणि भावनिक जिव्हाळा आणखी वाढत जातो.

सोशल मीडियावरही भन्नाट प्रतिक्रिया

हा गोड क्षण सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर त्यावर नेटकऱ्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे. काही जणांनी हा क्षण ‘मॉम-टू-बीचा सर्वात सुंदर excitement’ असल्याचं म्हटलं, तर काहींनी बाळाच्या आगमनासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. खरंच, आईच्या चेहऱ्यावर दिसणारा हा आनंद शब्दांपेक्षा खूप काही सांगून जातो. बाळ अजून जगात आलेलं नसतानाही त्याच्यासाठी इतकं प्रेम आणि उत्साह… यापेक्षा सुंदर काय असू शकतं.