काशी-विश्वनाथच्या कॉरिडोरच नुकतचं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटन केलं. परंतु या लोकार्पणाच्या आधीचा एक व्हिडीओ सध्या जास्त चर्चेमध्ये आहे. कशी-विश्वनाथच्या कॉरिडोरच्या लोकार्पण कार्यक्रमाच्या आधी पंतप्रधान मोदी मजुरांमध्ये गेले. त्यांनी त्यांच्यासोबत बसून ग्रुप फोटोही काढला. या क्षणाचा व्हिडीओ कायदा मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या इंस्ट्राग्रामवर पोस्ट केला आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

व्हिडीओमध्ये दिसत आहे की हॉलमध्ये मजूर बसले आहेत. तेव्हाच हॉलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी येतात. तिकडे उपस्थित मजूर टाळ्यांच्या गजरात मोदींचं स्वागत करतात. मजुरांच्या पुढे पंतप्रधान मोदींना बसण्यासाठी खुर्ची ठेवली होती. परंतु मोदीजी ती खुर्ची बाजूला करतात आणि एका व्यक्तीला घेऊन जायला देतात.

( हे ही वाचा: देसी जुगाड! शेतकऱ्याने भंगारातून बनवली अशी गाडी की त्यापुढे मोठे इंजीनियरही होतील फेल; बघा Viral Video )

पुढे मोदी कामगारांजवळच्या रिकाम्या जागेत बसतात. यासोबतच काही मजुरांना जवळची जागा रिकामी असल्याचे दाखवून स्वत:ला त्यांना बोलवतात. यानंतर ते त्यांच्यासोबत फोटो काढतात. पंतप्रधानांच्या या व्हिडीओचे अनेकजण कौतुक करत आहेत.

( हे ही वाचा: शशी थरूर यांनी मिस युनिव्हर्स हरनाजसोबतचा फोटो पोस्ट करताच नेटीझन्सच्या भन्नाट प्रतिक्रिया )

काशी-विश्‍वनाथच्या कॉरिडोरच्या उद्घाटनाच्या वेळी पंतप्रधान मोदींनी मजुरांना श्रेय देत बोलले की हा भव्य परिसर निर्माण करण्यासाठी ज्या प्रत्येक श्रमिक बहिण-भावांनी घाम गाळला, मेहनत केली त्यांचे मी आभार मानतो. करोनाच्या या वेळेतही त्यांनी इथे काम थांबू दिलं नाही. पंतप्रधान मोदींनी या प्रोजेक्टवर काम करणाऱ्या मजुरांवर गुलाबपुष्पांचा वर्षाव केला.