पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे यूट्यूबवर १ कोटी सब्सक्राइबर्स झाले आहेत. हे स्थान मिळविणारे ते जगातील पहिले नेते आहेत. मोदींचे यूट्यूब चॅनल Narendra Modi या नावाने आहे. २६ ऑक्टोबर २००७ रोजी पीएम मोदी यांचं यूट्यूब खातं सुरु केलं होतं. मात्र त्यांनी चार वर्षांनंतर १८ मार्च २०११ रोजी पहिला व्हिडीओ अपलोड केला होता. हा व्हिडिओ गुजरातच्या २०११-१२ च्या अर्थसंकल्पातील आहे. या व्हिडिओला ३५,३७५ व्ह्यूज मिळाले होते. तर १४०० लाईक्स मिळाले आहेत. तेव्हापासून त्यांच्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होत आहेत. जागतिक नेत्यामध्ये मोदींनंतर ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो यांचा क्रमांक लागतो. त्यांचे ३६ लाख सब्सक्राइबर्स आहेत. या यादीत मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष आंद्रेस मॅन्युएल लोपेझ ओब्राडोर तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांचे ३०.७ लाख सब्सक्राइबर्स आहेत. त्यानंतर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष जोको विडोडो आणि शेवटी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचा क्रमांक लागतो. भारतात नरेंद्र मोदींनंतर राहुल गांधींच्या चॅनलचे यूट्यूब सब्सक्राइबर्सची संख्या सर्वाधिक आहे. राहुलच्या चॅनलचे ५.२५ लाख सबस्क्राइबर्स आहेत. शशी थरूर ४.३९ लाख सब्सक्राइबर्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्याचबरोबर असदुद्दीन ओवेसी यांचे ३.७३ लाख सब्सक्राइबर्स आहेत.

या चॅनलवरून पीएमओ इंडिया, भारतीय जनता पार्टी, योग विथ मोदी आणि एक्झाम वॉरियर्स मंत्रज या यूट्यूब चॅनेलचा प्रचारही करतात. त्यांच्या चॅनलवर सरकारशी संबंधित योजना, थेट कार्यक्रमही दाखवतात.

JAY SHANKAR
अन्वयार्थ: हे मुत्सद्दी की प्रचारकच!
Joe Biden
नेतन्याहू यांचा युद्धाकडे पाहण्याचा दृष्टिकोन ही चूक; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भूमिका
un spokesperson on arvind kejariwal arrest
अमेरिका, जर्मनी पाठोपाठ केजरीवाल प्रकरणात संयुक्त राष्ट्रांकडूनही चिंता व्यक्त; म्हणाले, “भारतातील प्रत्येकाचे…”
donald trump dictator
“बराक ओबामा ISIS चे संस्थापक, मॉस्कोतील मृतांना तेच जबाबदार”, डोनाल्ड ट्रम्प यांचा व्हीडिओ व्हायरल!

मोदींच्या चॅनलचा सर्वाधिक लोकप्रिय व्हिडिओ एका दिव्यांगाचा आहे. १४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये मोदी एका तरुणाला भेटत आहेत. तरुण मोदींशी बोलतात आणि नंतर त्यांच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतात. हा व्हिडिओ काशीचा आहे. हा १९ फेब्रुवारी २०१९ रोजी अपलोड केले होता. त्याला ७ कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर ११ लाख लाईक्स मिळाले आहेत.