Bank Employee Abuse Customer Viral Video: सार्वजनिक बँकातील कर्मचारी अनेकदा ग्राहकांशी उर्मटपणे बोलत असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले असतील पण खासगी बँकेत मात्र कर्मचाऱ्यांशी अदबीने बोलले जाते, असा अनेकांचा अनुभव आहे. पण उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये खासगी बँकेत खातेदाराला एका वाईट अनुभवाला सामोरे जावे लागले आहे. कानपूरच्या एचडीएफसी बँकेतील एका महिला कर्मचाऱ्याचा आणि खातेदाराचा किरकोळ वाद झाला. या वादाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे?
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये महिला बँक कर्मचाऱ्याचे नाव आस्था असल्याचे सांगितले जाते. खातेदाराने नीट बोलावे, असा आस्था सांगत असताना मधेच ती आपल्या जातीचा उल्लेख करून खातेदाराला धमकावत असल्याचे दिसते.
एक महिला खातेधारक बँकेच्या काऊंटरवर काहीतरी समस्या घेऊन जाते. मात्र काही कारणावरून कर्मचारी आणि खातेदारामध्ये अचानक वाद सुरू होतो. यावेळी महिला कर्मचारी ‘मी ठाकूर आहे’, असे दर्डावून सांगते. ‘मी ठाकूर आहे. माझ्याशी नीट बोल’, असे सांगून सदर महिला कर्मचारी दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करते. इतर कर्मचारी या महिलेला थांबविण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र त्यांनाही ती बधत नाही.
यावेळी इतर कर्मचारीही व्हिडीओत दिसत आहेत. ते हा वाद सोडविण्याचा प्रयत्न करतात. मात्र संतापलेली बँक कर्मचारी काही केल्या थांबत नाही. ‘तुम्ही शांतपणे बोला’, असे महिला खातेधारक सांगतान ऐकू येते. मात्र हाच सल्ला तूम्ही तुमच्या पतीला द्या, असे प्रत्युत्तर महिला कर्मचाऱ्याकडून दिले जाते.
"Thakur hoon main, ?
— Suraj Kumar Bauddh (@SurajKrBauddh) February 8, 2026
bakchodi mat karna mere se." ??
Astha Singh, an HDFC employee, flaunted her caste on the bank premises and tried to beat a customer without any shame.
This 'Manu Ki Naatin' has only merit of hate. HDFC must kick out this casteist clown now. pic.twitter.com/MVFND1m1y4
सोशल मीडियावर होतेय टीका
हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता अनेक सोशल मीडिया युजर एचडीएफसी बँकेला टॅग करून त्यांनी खातेदारांची चांगली काळजी घेतली असल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देत आहेत. तर काही युजर बँक कर्मचाऱ्याच्या उर्मट वर्तनाकडे बोट दाखवत आहेत.
एका युजरने लिहिले, “या महिला बँक कर्मचाऱ्याविरोधात खटला दाखल करून बँक त्यांची विभागीय चौकशी करेल, अशी आशा करूयात. या प्रकरणामुळे कामाच्या ठिकाणी कसे वागावे, ग्राहकांशी कसे बोलावे आणि कर्तव्यावर असताना जात कशी दूर ठेवावी, याचे प्रशिक्षण द्यायला हवे.”
