Pune Car Hit To MPSC Students : काही दिवसांपासून देशभरात हिट अॅण्ड रनची प्रकरणं दिवसेंदिवस वाढताना दिसतायत. अशा घटनांवर कायदेशीर कारवाई केली जाते. मात्र, त्यानंतरही अशा घटना कमी होण्याचे नाव घेत नाहीत. पण, यात सर्वसामान्य लोकांना नाहक जीव गमवावा लागतोय. अशाच प्रकारच्या हिट अॅण्ड रनच्या घटनेचा एक व्हिडीओ समोर आला आहे. पुण्यात शहरातील सदाशिव पेठ परिसरात भावे हायस्कूल जवळ चहा प्यायला आलेल्या एमपीएससीच्या १२ विद्यार्थ्यांना एका कार चालकाने उडवल्याची घटना घडली. ही धडक इतकी जोरदार होती की, विद्यार्थी अक्षरश: चिरडले असून वेदनेनं ओरडताना दिसत आहेत. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. यामध्ये अपघात नेमका कसा घडला? ते स्पष्ट दिसत आहे. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहू तुमच्याही अंगावर काटा येईल.

पुण्यात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासासाठी अनेक क्लास आहेत. इथे अनेक अभ्यासिका देखील आहेत. त्यामुळे अधिकारी होण्याचं स्वप्न उराशी बाळगत इथे राज्यभरातील हजारो तरुण येतात. अपघात घडला त्या परिसरात अनेक अभ्यासिका आहेत. इथे मोठ्या प्रमाणात MPSC चा अभ्यास करणारे विद्यार्थी राहतात. याशिवाय बाजूला हायस्कूल देखील आहे. संध्याकाळची वेळ असल्याने काही विद्यार्थी चहाच्या स्टॉलवर गेले होते. यावेळी तिथे आलेल्या भरधाव कारने अनेकांना उडवलं.हा कार चालक दारू पिऊन कार चालवत होता हे समोर आलं आहे. दारू पिऊन कार चालवणाऱ्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यातील जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू आहेत. या अपघाताची थरकाप उडवणारी घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून, व्हिडीओ पाहून तुमच्याही काळजात धस्स होईल.

पाहा व्हिडीओ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ journalist.ajay_25 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून कॅप्शनमध्ये, “माणसाच्या एका चुकीने दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं… सदाशिव पेठेत एका बेधुंद चालकाने भरधाव वेगात गाडी चालवून MPSC ची तयारी करणाऱ्या मुलांना उडवलं. जयराम मुंठे नावाचा हा चालक दारूच्या नशेत होता. त्याच्या निष्काळजीपणामुळे एका मुलाचं पायाचं हाड मोडलं, आणि आता त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. विशेष म्हणजे त्या विद्यार्थ्याचा रविवारी कंबाइंड MPSC चा पेपर होता. अनेक महिन्यांची मेहनत, अनेक स्वप्नं आणि भविष्य घडवण्यासाठी घेतलेली तयारी एका क्षणात हद्दपार झाली. दारू पिऊन गाडी चालवणं ही केवळ चूक नाही, ती गुन्हा आहे. कोणाच्या तरी स्वप्नांचं, मेहनतीचं, आणि संपूर्ण आयुष्याचं मोल फक्त एका नशेच्या वेडात गेलं. आपण सगळेच अपील करुया — अशा बेफिकीर आणि बेवड्या लोकांविरोधात कडक कारवाई व्हावी. आणि त्या विद्यार्थ्याला न्याय मिळावा.