Accident Viral video: सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामध्ये बरेचसे व्हिडीओ हे अपघातांचे असतात. रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे अपघात कधी समोरच्या चालकाच्या चुकीनं होतात, तर कधी स्वत:च्या चुकांमुळे होतात. बहुतेक वेळा यात तुम्ही चालत्या गाड्यांमध्ये टक्कर झाल्याचं, एखादी गाडी अनियंत्रित झाल्याचं, गाडी पुलावरून खाली कोसळल्याचं किंवा गाडीला आग लागल्याचं, गाडीखाली कुणीतरी चिरडल्याचं पाहिलं असेल. पण, असे अपघात चालत्या गाड्यांमध्येच होतात, असे नाही; तर एखादी रस्त्याच्या शेजारी उभी केलेली गाडीही जीवघेणी ठरू शकते.

अनेकदा तर एखाद्या व्यक्तीला धडकून तो गंभीर जखमी झालेला असतानाही त्याला मदत करण्याऐवजी लोक पळ काढण्याचाच विचार करतात. मात्र, आता पुण्याच्या एका तरुणीला परदेशात एक असा अनुभव आला, ज्याने तिच्यासोबतच नेटकऱ्यांचंही मन जिंकलं. एका बस चालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणाचा व्हिडिओ तिने शेअर केला असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

झालं असं की, न्यूझीलंडमध्ये शिक्षण घेत असलेल्या मूळच्या पुण्याच्या श्रेया गुप्ते या तरुणीसोबत हा थक्क करणारा प्रसंग घडला आहे. श्रेयाच्या रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या कारला एका बसने धडक दिली. सहसा ही धडक देताना मालक तिथे उपस्थित नसेल, तर गुपचूप तिथून पळ काढण्याचा मार्गच अनेकजण अवलंबतात. पण त्यानंतर त्या ड्रायव्हरने जे काही केले, त्याने पुण्यातील श्रेयाचे आणि सोशल मीडियावरील हजारो लोकांचे मन जिंकले आहे.

उच्च शिक्षणासाठी न्यूझीलंडमध्ये गेलेल्या श्रेया गुप्ते हिने सांगितले की, तिने नेहमीप्रमाणे सकाळी युनिव्हर्सिटीच्या बाहेर आपली कार पार्क केली होती. संध्याकाळी ५ च्या सुमारास जेव्हा ती कारजवळ परतली, तेव्हा कारच्या समोरील काचेवर एक कागदाचा तुकडा दिसला. कुणीतरी तिच्यासाठी ‘नोट’ ठेवलेली होती. सुरुवातीला श्रेया प्रचंड घाबरली. तिला वाटलं की कोणीतरी तिच्या कारला धडक देऊन पळ काढला असेल आणि आता मोठे नुकसान झाले असेल. मात्र, तिने जेव्हा ती नोट हातात घेऊन वाचली, तेव्हा ती स्वतःला व्हिडिओ बनवण्यापासून थांबवू शकली नाही.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ shreeya_gupte21 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.