Dagdusheth Halwai Ganpati 2024: मुंबई, पुण्यासह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आणि एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. पुण्यात मानाच्या गणपतीबरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपती. पुण्यातील प्रसिद्ध आणि मानांच्या गणेशोत्सव मंडळांपैकी एक असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणेशोत्सव. मंडळाच्या गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची दरवर्षी गणेशोत्सवामध्ये भाविकांची मोठी गर्दी असते. या गणेशोत्सव मंडळाचे यंदा १३२ वे वर्षे आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवासाठी मंडळाकडून हिमाचल प्रदेशमधील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे.

दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला नेहमीच भाविकांची गर्दी असते आणि त्यात गणेशोत्सवात तर येथे दर्शनाला तुफान गर्दी असते. बाप्पाचं साजरं रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. यावेळी भाविक तासन् तास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतात. याच दगडशेठ गणपती बाप्पााच्या दर्शनासाठी आलेल्या अलोट गर्दीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुमचीही झोप उडेल तसेच श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पााच्या दर्शनाला जाताना तुम्हीही विचार कराल.

Tiger effortlessly jumps across the river with a single leap Tiger Crossing River By Jump Animal Video
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! जंगलाच्या राजाचा ‘हा’ VIDEO पाहून कळेल आयुष्य कसं जगायचं
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Mumbais air quality worsened from Diwali fireworks displays on first day itself
दिवाळीनंतरही मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत सुधारणा नाहीच!, सलग पाच दिवसांच्या घसरणीमुळे अशुद्ध हवा
Testy bhindi fry khatti mitthi bhindi lady fingars recipe for lunch or diner
भेंडीची खट्टी -मीठी भाजी; ती पण चिकट न होता! पाहा सोपी मराठी रेसिपी
Banke Bihari Mandir video AC water as charnamrit
चरणामृत समजून भाविक पितायत एसीचे पाणी; बांके बिहारी मंदिरातील धक्कादायक VIDEO
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
What is the right time to have breakfast
सकाळी ८ ते १० नाही, तर नाश्त्याची ही वेळसुद्धा ठरू शकते फायदेशीर? वाचा तज्ज्ञांचे मत…
Pune air, bad air, Pune air at hazardous levels
पुण्याची हवा धोकादायक पातळीवर, बिघडलेल्या हवेचे परिणाम काय?

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही गर्दी लालबाग परळची नाहीये तर ही गर्दी आहे पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिराबाहेरची. एवढंच नाहीतर ही वेळ आहे रात्रीची २ वाजताची. बाप्पाच्या दर्शनासाठी सगळे पुणेकर एकाच दिवशी आलेत की काय असं हा व्हिडीओ पाहून वाटतंय. कारण जिथपर्यंत नजर जातेय तिथपर्यंत पुणेकरांनी बाप्पाच्या दर्शनासाठी रांग लावली आहे. भक्तांची ही गर्दी अक्षरश: वरुन बघताना मुंग्यांप्रमाणे दिसत आहे. मात्र यामध्ये एक विशेष आहे ते म्हणजे एवढी गर्दी असूनही कुठेही धक्का-बुक्की दिसत नाहीये. तसेच रांगही लवकर पुढे जात आहे. मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ‘व्हायरल’ होणारे उत्सवी वातावरण, सोशल मीडियावर टाकले जाणारे फोटो, रील्स यांना ‘लाइक्स’ मिळविण्याची हौस अधिक घातक ठरत असल्याची बाब या घटनेमुळे समोर आली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> आजीनं बाप्पाच्या दर्शनासाठी कार्यकर्त्याचे धरले पाय, पण…, लालबागमधील संतापजनक VIDEO पाहून तुम्हीच सांगा यात चूक कुणाची ?

सोशल मीडियावर हा व्हिडीओ bappapune नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओ पाहून नेटकरीही थक्क झाले आहेत. नेटकरी यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, “गणपती बाप्पा मोरया, पुणे तिथे काय उणे, पुणेकर आणि बाप्पाचं नात वेगळं आहे…” अशा असंख्य प्रतिक्रिया यावर आल्या आहेत.