Recycling Of Plastic Wrappers: आपल्या रोजच्या जीवनात प्लास्टिकच्या वस्तू वापरण्याचे प्रमाण किती आहे याचा आपण कधीच विचार करत नाही, कारण आपल्या जीवनशैलीत आता या गोष्टी अविभाज्य झाल्या आहेत नाही का? पण विचार करा की वापर झाल्यावर यापैकी किती गोष्टी आपण पुन्हा वापर करण्यासाठी ठेवून देतो किंवा भंगारवाल्याला विकतो, फारच थोड्या गोष्टी आपण जपून ठेवतो किंवा भंगारवाल्याला विकतो, बहुतांश वस्तू आपण कचऱ्यात फेकून देतो. त्याचा परिणाम पर्यावरणाच्या प्रदुषणावर होतो. पण आता समाज बदलतो आहे. पर्यावरणाच्या हानीचा विचार लोक करू लागले आहेत, त्यातूनच या टाकाऊ प्लास्टिक पासून पुन्हा वापर करता येईल असे काय करता येईल ज्यातून त्याचे होणारे प्रदुषण टाळता येईल हा विचार करण्यात आला आणि पुणेकर महिलांनी चिप्सच्या पाकिटांपासून पिशवी बनवण्यास सुरूवात केली. आहे ना, इंटरेस्टिंग! याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आपण सारेच जण घराबाहेर पडल्यानंतर दुकानातून चिप्स विकत घेतो आणि टाईमपास म्हणून खातो. त्यानंतर ते सर्रासपणे आपण फेकून देतो. पण तुम्ही कधी विचार केलाय का हेच चिप्सची पाकिटं तुमच्या उपयोगाची ठरू शकतात. होय. कसं ते हा व्हायरल व्हिडीओ तुम्हाला सांगेल. पुणेकर महिलांनी यावर एक उत्तम पर्याय शोधून काढलाय. चिप्सच्या पाकिटांपासून महिलांनी चक्क पिशवी तयार केली आहे, जी तुम्ही बाजारात गेल्यानंतर मदतीची ठरू शकते. सध्या केंद्रीय सरकारने एके री वापरातील प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला असून त्यानंतप सर्वसामान्यांना बाजारात जाताना अडचणी येऊ लागल्या आहेत. प्लास्टिकला पर्याय काय, याचेही उत्तर नाही. पण काही प्लास्टिकचा आपण पुर्नवापर करू शकतो हे या महिलांनी दाखवून दिलंय.

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
A young boy K Ayushmaan Rao dresses up as Ram Lalla
चिमुकला रामलल्ला पाहिला का? रामलल्लांच्या वेषभूषेतील रामभक्ताचा व्हिडीओ होतोय व्हायरल
Post on Mumbai woman seeking groom who earns at least Rs 1 crore goes viral
“मला करोडपती नवरा पाहिजे!” मुंबईची तरुणी शोधत्येय जोडीदार; अपेक्षा वाचून चक्रावले नेटकरी, Viral Post एकदा बघाच
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल

आणखी वाचा : झोपलेल्या मालकाला उठवण्यासाठी मांजरीनं शोधली ही अजब पद्धत; VIRAL VIDEO पाहून आवरणार नाही हसू

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, काही महिला हातमाग वापरून चिप्सच्या प्लास्टिकचे आवरण कापून टिकाऊ कपड्यांमध्ये रूपांतरित करताना दिसत आहेत. मग या विणलेल्या प्लास्टिकच्या कापडापासून ते कपडे शिवून पिशव्या आणि प्लांटर्ससारखे पदार्थ बनवतात. हा व्हिडीओ पाहून सारेच जण थक्क झाले आहेत. आपण जे चिप्सची पाकिट फेकून देतो त्याचा असाही वापर केला जाऊ शकतो हे पाहून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसलाय. या चिप्सच्या पाकिटांपासून तुम्ही पिशव्या किंवा कपडेही बनवू शकता? ही कल्पना प्रत्यक्षात पाहून प्रत्येक जण हा व्हिडीओ आपल्या जवळच्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवारांमध्ये शेअर करू लागले आहेत.

आणखी वाचा : चालत्या गाडीच्या खिडकीतून मुलगी पडली, ड्रायव्हरला कळलंच नाही; पुढे काय झालं? पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ २५ जुलै रोजी EcoKaari (@ecokaari) च्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला होता. EcoKaari ने आपल्या पोस्टमध्ये बहुस्तरीय प्लास्टिक (MLPs) च्या दुष्परिणामांबद्दल माहिती सुद्धा शेअर केली आहे आणि लोकांना प्लास्टिकच्या वापरासाठी ‘नकार, कमी, पुनर्वापर’ करण्यास प्रोत्साहित केले आहे. इतकंच नाही तर त्यांनी पोस्टच्या माध्यमातून लोकांना टिकाऊ उत्पादनांच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे आणि पर्यावरण वाचवण्यासाठी प्लास्टिकचे दान करण्याचे आवाहन केले आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : चालत्या गाडीतून थेट दुसऱ्या गाडीमध्ये गेला आणि पुन्हा पहिल्या गाडीवर आला, पाहून सारेच थक्क

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : महापुरात अडकलेल्या हत्तीला वाचवले, सात तासांच्या बचाव मोहिमेचा VIDEO VIRAL

साहजिकच या महिलांचा हा उपक्रम अतिशय नावीन्यपूर्ण असून प्लास्टिकमुळे पर्यावरणाला होणाऱ्या हानीपासून पृथ्वीला वाचवण्याचाही हा एक प्रभावी मार्ग आहे. हा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येतोय. हा व्हिडीओ लोकांना इतका आवडू लागलाय की आतापर्यंत या व्हिडीओला ५ मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर २ लाख ६० हजारांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओ लाईक करत आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया शेअर केल्या आहेत. अनेकांनी या पर्यावरणपूरक उपक्रमाचे कौतुक केलं आहे.