Vikas Lohatia Excel Sheet Arranged Marriageअ‍ॅरेंज पद्धतीने लग्न करण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या २९ वर्षीय पुण्यातील तरुणाचे अखेर एक वर्षानंतर लग्न ठरले आहे. विकास लोहटिया असे या तरुणाचे नाव असून, त्याने लग्नासाठी तयार केलेली एक्सेल शीट चांगलीच व्हायरल झाली होती. या एक्सेल शीटमध्ये त्याची मुलींबरोबर सुरु असणारी बोलणी, कुटुंबीयांकडून मिळालेला प्रसिसाद आणि पुढं सुरु असणाऱ्या गोष्टींचा उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, एक वर्षानंतर विकासला त्याचा योग्य जोडीदार मिळाली असून, दोघेही २०२७ मध्ये लग्नाच्या पवित्र बंधनांत अडकणार आहेत.

५५ स्थळांनंतर विकासला मिळाली जोडीदार

विकासने अ‍ॅरेंज पद्धतीने लग्न करण्यासाठी एक्सेल शीट तयार केली होती. यात त्याला आलेल्या लग्न स्थळांचा माहिती नमूद करण्यात आली होती. यामध्ये जवळपास ५५ स्थळांचा उल्लेख आहे. संबंधित स्थळ आणि मुलींच्या कुटुंबीयांशी सुरु असणारी किंवा झालेली माहिती विकासने या शीटमध्ये नमूद केली होती. ५५ स्थळांकडून त्याला कधी सकारात्मक प्रतिसाद मिळाला तर कधी स्पष्ट नकार काही स्थळांची बोलणी पुढं गेली पण, अंतिम ठराव झाला नाही. अखेर एक वर्ष आणि ५५ स्थळांनंतर विकासला योग्य जोडीदार मिळाला आहे.

एक्सेल शीट झाली होती व्हायरल

विकास लोहटिया एका कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. शिवाय तो कंटेट क्रिएटर देखील आहे. २०२५ मध्ये त्याने तयार केलेली एक्सेल शीट मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन व्हायरल झाली होती. ऑक्टोबर २०२५ मध्ये एक्सेल शीट तयार केल्याचे विकासने एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना सांगितले. सध्या परफेक्ट मॅच झालेल्या मुलीशी मेट्रीमोनियल साईटवर भेट झाल्याचे तो सांगतो. नऊ महिने तिच्याशी संवाद साधल्यानंतर अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. गुरुग्राम येथील ही तरुणी शिक्षिका असल्याची माहिती त्याने दिली आहे.

एक्सेल शीटचा कसा फायदा झाला?

तरुणीच्या अपेक्षा जुळून आल्याने आणि तिला पुण्यात स्थायिक व्हायचे असल्याचेही त्याने पुढे सांगितले. एक्सेल शीटमुळे दोघांमध्ये होणारा संवाद आणि त्या पार्श्वभूमीवर दोघांचा कॉम्पॅटाबिलिटी तपासली, यात दोघांच्या आवडी – निवडी, आयुष्याबाबत दृष्टीकोन, ध्येय्य, अपेक्षा जुळून आल्याचे विकास सांगतो. एक्सेल शीटमध्ये अशाप्रकारे इतर स्थळांची देखील माहिती त्याने अपडेट केली होती. अखेर एका स्थळाबरोबर कॉम्पॅटाबिलिटी मॅच झाल्याचे त्याने म्हटले आहे. तरुणी देखील हरियाणाची असून,मी देखील तिथलाच आहे पण गेल्या १२ वर्षांपासून मी पुण्यात राहतोय, असेही विकास म्हणाला. दोघेही जून २०२७ मध्ये लग्न करणार असल्याचेही त्याने सांगितले.