Pune Viral Video : सोशल मीडियावर अनेक जण वेगवेगळ्या प्रकारेच व्हिडीओ, रिल्स, फोटो शेअर करत असतात. काही लोक डान्स गाणी म्हणताना दिसतात तर काही लोक अनोखे जुगाड सांगताना दिसतात. काही लोक तर त्यांचे अनुभव शेअर करताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये ‘दादर २८’ या इन्स्टाग्राम अकाउंटचा युजर पुण्यातील मंडईत गेल्यानंतरचा त्याचा अनुभव शेअर करताना दिसला. त्याने त्याच्या या अकाउंटवरून एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की तो मंडईतील एका आज्जीबरोबर संवाद साधत आहे.
आज्जी – भामा रामचंद्र काळे
तरुण – या मंडईत तुम्ही कधीपासून आहात?
आज्जी – लहानपणापासून आहे
तरुण – येथे कोणी आलं होतं का?
आज्जी – इंदिरा गांधी आल्या होत्या. नेहरू आले होते. जीपमधून बसून आल्या होत्या. इंदिरा गांधी मागे बसल्या होत्या. नेहरू पुढे होते उभे. हात जोडून सर्वांना नमस्कार करत चालले होते.
तरुण – तेव्हा तुम्ही किती वर्षांचे होता?
आज्जी – असेल १५-१६ वर्षांची
तरुण – आणि आता तुमचे वय किती आहे?
आज्जी – ८० आणि ३
तरुण – पण तरी तुम्ही इतक्या फिट आहात? सुदृढ आहात?
आज्जी – कारण काय आहे. निर्व्यसनी असलं ना तर ठणठणीत राहातं?
तरुण – आणि तुम्हाला अजून काम करावंस का वाटतं? घरी तुम्हाला आराम करावासा नाही वाटतं का?
आज्जी – नाही ना.. मला घरी करमत नाही ना घरात.
तरुण – मग तुम्ही येथे किती वाजल्यापासून असता?
आज्जी – सकाळी ८ ते रात्री १०
तरुण – आणि सुट्टी कधी घेता?
आज्जी – सुट्टी घेतच नाही.
तरुण – तरुणांना काय सांगाल?
आज्जी – माझ्यासारखं काम करा. निर्व्यसनी राहा. माझ्यासारखी काम करा दणदणीत.
पाहा व्हायरल व्हिडीओ
या तरुणाने आज्जीबरोबर साधलेला संवाद ऐकून कोणीही थक्क होईल. या तरुणाने या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्याच्या मंडईत काही कामानिमित्त जाण्याचा योग आला आणि त्यात ह्या भामा आजींची भेट झाली, आज वय वर्षे ८३ असताना सुद्धा त्या एकही दिवस सुट्टी न घेता अविरत काम करत आहेत त्यांच्या फिटनेसचं रहस्य खास करून प्रत्येक तरूणाने ऐकणे गरजेचं आहे.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “अशी पिढी पुढे होणे नाही.” तर एका युजरने लिहिलेय, “आम्ही मंडई मध्ये गेलो की या आज्जी कडून लसूण आणि आलं घेत असतो नेहमी” आणखी एका युजरने लिहिलेय, “जुनं ते सोनं.. मेहनत” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.