मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर टँकर उलटल्याने काल रात्रीपासून मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. सध्या या द्रुतगती महामार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. अपघाताला १७ तास उलटले तरी अजून या मार्गावर वाहतूक सुरळीत होऊ शकली नाही. या घटनेचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेच्या पाश्वभुमी दरम्यान, सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध केलेला वाहतूक कोंडीचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे.वाहतूक कोंडी हा आज केवळ एखाद्या शहराचा किंवा रस्त्याचा प्रश्न राहिलेला नाही, तर तो आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनला आहे. वेगाने वाढणारी वाहने, बेशिस्तपणा, नियमांकडे होणारे दुर्लक्ष आणि ‘मी आधी जाणार’ ही मानसिकता असल्यामुळे भारतातील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी नेहमीच पाहायला मिळतात.

अनेक ठिकाणी वाहतूक नियमाचे उल्लंघन केले जाते. नागरिक किंवा वाहनचालकही नियमांकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ट्रॅफिक जॅम होतो, अपघात वाढतात आणि वेळ वाया जातो; भारतात एकीकडे बेशिस्तपणा, वाहतूक नियमांचे उल्लंघन अन् कधीही होणारी वाहतूक कोंडी असे चित्र असताना काही देशांमध्ये लोक नियम प्रामाणिकपणे पाळतात. पोलिसही नियमांची कडक अंमलबजावणी करतात. त्यामुळे रस्त्यावर गोंधळ होत नाही, वाहतूक सुरळीत चालते आणि लोकांचा वेळ वाया जात नसून तो वाचतो.

हाच फरक शिस्त असलेल्या देशांमध्ये आणि नियम न पाळणाऱ्या ठिकाणी सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवांपूर्वी चर्चेत आलेला वाहतूक कोंडी व्हिडीओ हा चीन मधील आहे. . त्या व्हिडीओमध्ये चीनमधील एका एक्स्प्रेस हायवेवर वाहनांची मोठी रांग लागलेली दिसत आहे पण वाहनचालक अत्यंत शिस्तीने आणि शांतपणे आपापल्या मार्गिकेमध्येच वाहन चालवताना दिसतात. कुठेही हॉर्नचा आवाज नाही किंवा गोंधळ नाही. सर्व जण शिस्त पाळत असल्यामुळे वाहतूक सुरळीत पुढे सरकत असल्याचे दिसते.

याचदरम्यान चीनमधील एका गजबजलेल्या रस्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला. त्या व्हिडीओमध्ये वाहतूक जरी जास्त असली तरी वाहनचालक शांतपणे आपापल्या मार्गिकेमध्येच चालताना दिसतात. कुठेही हॉर्नचा आवाज नाही किंवा गोंधळ नाही. सर्व जण शिस्त पाळत असल्यामुळे वाहतूक सुरळीत पुढे सरकत असल्याचे दिसते. या दोन वेगवेगळ्या दृश्यांची तुलना झाल्यामुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली.

भारत आणि चीनमधील वाहतूक कोंडीच्या या दोन्ही व्हिडीओची तुलना केली जात असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली. अनेक लोकांनी “आपल्याकडे नियम आहेत; पण ते पाळणारे फारच कमी आहेत” अशी नाराजी व्यक्त केली. अनेक लोकांनी “आपल्याकडे नियम आहेत; पण ते पाळणारे फारच कमी आहेत” अशी नाराजी व्यक्त केली.

पाहा व्हिडीओ

पुणे-मुंबई एक्सप्रेसवे वरील वाहतूक

चीन मधील वाहतूक

काहींनी नागरिकांमध्ये शिस्त आणि सामूहिक जबाबदारीची कमतरता असल्याचे सांगितले. “कारचालकांमध्ये खूप शिस्त आहे” आणि “आपल्यालाही नागरी कर्तव्य शिकण्याची गरज आहे” अशा प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाल्या. या सगळ्या चर्चेतून एक महत्त्वाची गोष्ट समोर येते. वाहतूक कोंडी ही फक्त खराब रस्ते किंवा प्रशासनाची चूक नसते, तर आपण सगळेच त्याला जबाबदार असतो. मार्गिका तोडणे, मधेच वाहन थांबवणे, घाई करणे किंवा नियमांकडे दुर्लक्ष करणे यांमुळे अपघात होतात. अपघात झाले की, रस्त्यावर तासन्‌ तास वाहतूक कोंडी होते आणि सामान्य लोकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. अशा वेळी प्रशासन प्रयत्न करत असले तरी परिस्थिती लगेच हाताळली जात नाही.

पण, जर प्रत्येक वाहनचालकाने थोडासा संयम ठेवला, आपली मार्गिका सोडली नाही, वेगमर्यादा पाळली आणि इतरांना समजून घेतले, तर गर्दीच्या काळातही वाहतूक सुरळीत ठेवणे शक्य आहे. थोडी सवय लावली आणि जबाबदारी घेतली, तर रस्ते सुरक्षित होतील. शेवटी सुरक्षित प्रवास हा फक्त स्वतःसाठी नाही, तर रस्त्यावर असलेल्या प्रत्येकासाठी महत्त्वाचा असतो.