Pune Navale Bridge Accident: पुणे बंगळुरु महामार्गावरील नवले पूल हा अपघाताचा हॉट स्पॉट बनत आहे.गेल्या काही वर्षांपासून पुण्यातील नवले पूल हा सातत्याने या ठिकाणी होणाऱ्या अपघातांमुळे चर्चेत आहे. अशातच आज पुन्हा एकदा नवले ब्रिजवर एक भीषण अपघात झाला आहे. यामध्ये दोन ट्रकच्यामध्ये पिकअपचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे. याचा व्हिडीओही सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धडकी भरेल. मागील ८ वर्षात नवले पुलावर २१० अपघात घडले ज्यात ८२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक स्थानिक नागरिक तर या रस्त्यावरून प्रवास करणे टाळतात. स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्यापासून थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत या पुलाबाबत अनेक वेळा चर्चा, बैठका आढावा घेण्यात आल्या मात्र परिस्थिती अजूनही जैसे थे आहे.
अपघात झाल्यानंतर तातडीने पोलिसांनी, अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली तर दुसऱ्या बाजूला स्थानिकांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू होते. मात्र अपघात इतका भयानक होता की मध्यभागी अडकलेल्या चारचाकीचा चक्काचूर झाला होता.यात एकाचा मृत्यू झाला आहे. घटनेचे कारण शोधण्यासाठी प्रशासन तपास करत आहे, तर परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला.बंगलोर मुंबई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरून पुण्याच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कात्रजचा नवीन बोगदा आहे. हा बोगदा संपला की नवले पुलाजवळ तीव्र उतार आहे. या उतारामुळे चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटतं आणि अपघात घडतात. सततच्या अपघातांमुळे या रस्त्याला किंवा या स्पॉटला ‘डेथ स्पॉट’ किंवा ‘अपघाताचा हॉटस्पॉट’ म्हणलं जातं.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर दररोज अपघातांचे वेगवेगळे व्हिडीओ समोर येत असतात. काही अपघात हे वाहनचालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात; तर काही अपघात दुसऱ्याच्या चुकीमुळे घडून येतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे; जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे. ‘अतिघाई संकटात नेई’, असे म्हणतात. याचाच प्रत्यय हा व्हिडीओ पाहून आला आहे. काही वेळा लोक घाई-गडबडीत अशा चुका करतात की, ज्याचा त्यांना नंतर पश्चात्ताप होतो. जगात रोज कुठे ना कुठे अपघात होत असतात. वर्षभरात जगात हजारो लोक रस्ते अपघातात मारले जातात. कधी स्वत:च्या चुकीने अपघात होतो, तर कधी समोरच्या वाहनाच्या चुकीने अपघात होतो. कधी ड्रायव्हरला डुलकी लागते, तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटते, तर कधी गाडीचा वेग अधिक असल्याने अपघात घडतातात.
