scorecardresearch

Premium

Pune : पुण्यातील पडती इमारत पाहिली का? व्हिडीओ होतोय व्हायरल

तुम्ही पुण्यातल्या एका इमारतीविषयी ऐकले आहे का? ही इमारत पडती आहे. होय, या पडती इमारतीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

do you see Iconic Building of Pune Camp
पुण्यातील पडती इमारत पाहिली का? (Photo : Being Punekar/ Facebook)

Viral Video : पुणे हे देशातील ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. सांस्कृतिक जपणारे शहर म्हणून पुण्याची ओळख आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात दरवर्षी हजारो विद्यार्थी येथे शिकायला येतात. सोशल मीडियावरही पुण्याच्या अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. पुण्याचे खाद्यपदार्थ असो की येथील ऐतिहासिक वास्तू, पुण्याच्या पाट्या तर नेहमीच चर्चेचा विषय असतो. पण तुम्ही पुण्यातल्या एका इमारतीविषयी ऐकले आहे का? ही इमारत पडती आहे. होय, या पडती इमारतीचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील ही पडती इमारत दाखवली आहे. ही खरंच पडती नाही तर या इमारतीचे बांधकाम असे केले आहे की ती आपल्याला पडणार की काय, असा भास होतो.
व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही इमारत अतिशय आकर्षक असून कुणाचे लक्ष वेधून घेते. पांढरा आणि निळा रंगामुळे येणाऱ्या जाणाऱ्याचे या इमारतीकडे सहज लक्ष जाते. ही इमारत कॅम्प परिसरात आहे.

sachin tendulkar share post on x about junabai tigress in Tadoba-Andhari Tiger Project
‘मास्टरब्लास्टर’ला पडली ‘जुनाबाई’ ची भुरळ, तिच्या तिन्ही पिढ्या पाहिल्याचा अभिमान
delivery boy was robbed pune
पुणे : कोयत्याच्या धाकाने डिलिव्हरी बॉयला लुटले
women breaking traffic rules nagpur
नागपूर : वाहतुकीचे नियम तोडण्यात तरुणी-महिला आघाडीवर, वाहतूक विभागाच्या कारवाईतून तपशील समोर
Mumbai Mira road attest viral video is fake
Fact check : मुंबई येथील मीरारोडचा व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडीओ खरा की खोटा? काय आहे सत्य जाणून घ्या

हेही वाचा : Video : गँग असावी तर अशी! रेल्वे स्टेशनवर मित्रमैत्रीणींचा बॉलीवूड गाण्यावर भन्नाट डान्स, पाहा व्हायरल व्हिडीओ

_amhi.punekar या अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील पडती बिल्डिंग पाहिली का?”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “हो.. ही इमारत कॅम्प परिसरात आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “लहानपणी आई सोबत बस मधून तिकडे जायची, त्यावेळेस खूप भीती वाटायची पडते का काय…” आणखी एका युजरने लिहिलेय, “अशीच इमारत साताऱ्यात सुद्धा आहे.”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pune news do you see iconic building of pune camp look like it will fall video goes viral ndj

First published on: 06-12-2023 at 10:04 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×