Viral Photo : सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. अनेकदा जुन्या गोष्टी सुद्धा पुन्हा व्हायरल होतात. सध्या असाच एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये स्क्रीनवर “स्वारगेट” या स्थानकाचे मराठी भाषांतर “स्वर्गात” असे चुकीच्या स्वरूपात दिसून येत आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून सर्वत्र एकच चर्चा रंगली आहे. काही लोकांच्या मते, हा फोटो जुना आहे, जो पुन्हा व्हायरल होत आहे. “आता पुणे मेट्रोने स्वर्गात जाता येणार” अशा आशयाचे कॅप्शन देऊन हा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र शेअर केला जात आहे. (pune photo viral of marathi translation of Swargate stop as Swargat on a Pune Metro station screen)

या व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला एक स्क्रिन दिसेल. ही स्क्रिन पुणे मेट्रो स्टेशनवरील असल्याचा दावा केला जात आहे. या स्क्रिनवर मार्ग क्र, दरवाजा, स्थळ आणि अपेक्षित वेळ दिली आहे. या स्क्रिनवर तुम्हाला स्वारगेट या स्थळाचे मराठी भाषांतर ‘स्वर्गात’ असे लिहिलेले दिसून येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “आता पुणे मेट्रोने स्वर्गातही जाता येणार”

Young woman threatened suicide did scene in road accused man for making her private video viral
“का केलेस माझे खासगी व्हिडीओ व्हायरल?” तरुणीनं भर रस्त्यात घातला राडा; शेवटी आत्महत्येची धमकी दिली अन्.., पाहा धक्कादायक VIDEO
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
cat rescued By Young Boy
VIDEO: खिडकीवर अडकलेल्या मांजराला ‘त्याने’ असे वाचवले; मांजरीचे थरथरणारे पाय पाहून नेटकरीही भावूक झाले
Fact check video AI-generated video shared as that of Indian PM Modi's residence
सोन्याचं बाथरुम, २५ कोटींचा बेड; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अलिशान घरातील VIDEO होतायत व्हायरल? जाणून घ्या काय आहे सत्य
Pune Doctor funny medicine prescription viral on social media
PHOTO: पुण्यातल्या डॉक्टरांचा नाद नाय! पेशंटला दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर लिहिलं असं काही की वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल
Techies Bengaluru traffic meeting idea is a hit online
ट्रॅफिकमध्ये अटेंड करता येईल ऑफिस मिटिंग? Viral Photo पाहून सुचला भन्नाट जुगाड, नेटकऱ्यांना प्रंचड आवडली कल्पना
Bike went viral on social media due to quotes written in the back funny quote goes viral
“बायकोने सांगितलंय…”, पठ्ठ्याने बाइकच्या मागे लिहिलं ‘असं’ काही की, वाचून पोट धरून हसाल
young Chennai photographer was cheated for 13 lakh after being lured for shoot in Pune and Goa
‘प्री वेडिंग शूट’च्या आमिषाने चेन्नईतील छायाचित्रकाराची फसवणूक, महागड्या कॅमेऱ्यांसह १३ लाखांचे साहित्य चोरीला

पाहा व्हायरल फोटो (Viral Photo)

Photo Viral
Photo Viral

_punethings या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “स्क्रीनवर दाखवण्यात आलेल्या “स्वारगेट” या स्थानकाचे मराठी भाषांतर “स्वर्गात” असे चुकीच्या स्वरूपात दिसून आले आहे. या चुकांची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत असून आता ‘पुणे मेट्रोने स्वर्गात जाता येणार’ असे पोस्ट सोशल मीडिया वर व्हायरल होत आहे. पण सदर फोटो हा पुणे मेट्रोशी संबंधित नाही असे पुणे मेट्रोने जाहीर केले आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.

खरंच पुणे मेट्रोने केली का ही मोठी चूक?

याविषयी पुणे मेट्रोने अधिकृत अकाउंटवरून फोटो पोस्ट करत संबंधित फलक पुणे मेट्रोच्या कोणत्याही स्थानकावरील नाही, असे सांगितले आहे. metrorailpune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर केला असून या फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कृपया लक्ष द्या : समाजमाध्यमांवर तसेच व्हॉट्सअपवर प्रसारित होणारा या फलकाचा फोटो पुणे मेट्रोशी संबंधित नाही.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे मराठी लिहा वाचा” तर एका युजरने लिहिलेय, “स्वर्गात नाही ते स्वारगेट असेल” आणखी एका युजरने लिहिलेय, “हा खूप जुना फोटो आहे” काही युजर्सनी या फोटोवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader