गेल्या आठवड्यापासून राज्यात अवकाळी पावसामुळे चांगलेच झोडपले आहे. दरम्यान हवमान खात्याने पुढील दोन दिवसांसाठी ऑरेंड अलर्ट दिला आहे. दरम्यान आज(ता. २०) पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. ऐन रहदारीच्या वेळीच पावासाने हजेरी लावल्याने पुणेकरांची तारांबळ उडवली आहे. सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे अवघ्या तासभरात पुण्यातील रस्त्यांना नद्याचे स्वरुप आले आहे. दरम्यान पुण्यातील मध्यवर्ती पेठांमध्ये वाहतूक कोंडी झाली आहे.

पुण्यात अवकाळी पाऊस

हवामान तज्ज्ञ के.एस. होसळीकर यांनी आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली होती. राज्यात हवामन अतिशय सक्रिय राहील. कोकण, मध्य महाराष्ट्रात बुधवार गुरुवारी पावसाचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे. तसेच आज ५ वाजल्यानंतर कल्याण, पुणे, माथेरान, रायगड घाट माथ्यावर, श्रीवर्धन, दापोली ,नाशिक या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता तसेच हा पाऊन पुढील ३ ते ३.५ तास सुरू राहील अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.

सोशल मीडियावर #PuneRain हा टॅग चर्चे येत असून अनेकांना पावसाचे आणि परिसरातील सद्यस्थितीचे व्हिडिओ शेअर केले आहेत

पुण्यात मुसळधार पाऊस पडत असल्याचे व्हिडीओ काही लोकांनी एक्सवर पोस्ट केले आहेत.

पाषाण भागात पावसाची हजेरी

पौज रस्त्यावर पावसाची हजेरी

पुण्यात झालेल्या अवकाळी पावसाचे रुप पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

असा पाऊस कधीही पाहिला नाही, पुणेकरांनी शेअर केले व्हिडीओ

अवकाळी पावसाचा पुण्याला फटका, होर्डींग कोसळलं, कोणीही जखमी नाही.

काल झालेल्या पावसात विमाननगर येथीर रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले होते.