Viral video: ‘पुणे तिथे काय उणे’ असं पुण्याबाबत नेहमी म्हटलं जातं, याचा प्रत्यय आज आला. पुणे हे जगात प्रसिद्ध शहर आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. सोशल मीडियावर कधी काय फेमस होईल हे सांगता येत नाही. सोशल मिडियावर दररोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यामधील असे काही व्हिडीओ असतात, की ते बघितल्यानंतर आपण हसू आवरू शकत नाहीत. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसतो आहे. पुणेकर, पुणेकारांच्या गोष्टी, त्यांनी केलेले अपमान, त्यांच्या भन्नाट करामती आणि त्यासोबतच त्यांनी केलेले कौतुकास्पद आणि धैर्यवान कार्य याचे किस्से आपण कायमच ऐकतो. पुणेकरांनाचं असल्या भन्नाट कल्पना सुचू शकतात, असंही अनेकजण म्हणतात. मात्र हे तितकंच खरं देखील आहे. पुणेकरांच्या अनेक करामतींची राज्यभर चर्चा होते. अशाच एका करामतीचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे, हा व्हिडीओ पाहून तुम्ही म्हणाल ऐवढा कॉन्फिडन्स येतो तरी कठून…व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल.
सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल हे कोणीचं सांगू शकत नाही. रोज नवे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. लोकांना आवडलेले व्हिडीओ शक्यतो मिलियनमध्ये पाहिले जातात असं आतापर्यंत पाहण्यात आलं आहे. काही लोकांनी घरातील सामान वापरुन हेलीकॉप्टर तयार केलं आहे. काही लोकांनी घरगुती सामान वापरुन इलेक्ट्रीक स्कुटर तयार केली आहे. जुगाड केलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. ते व्हिडीओ पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. एका रिक्षा चालकाने आपली रिक्षाला जुगाड करुन चक्क कारचं स्टेअरिंग लावलंय. ज्यावेळी ही रिक्षा रस्त्यावर चालताना दिसते. त्यावेळी लोकं रिक्षाकडं पाहत बसतात.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका रिक्षा चालकानं चक्क आपल्या रिक्षाला कारचं स्टेअरिंग लावलं आहे. रिक्षाच्या दोन्ही हँडलच्यामध्ये कारचं स्टेअरिंग लावलं असून तो भर रस्त्यात इतर रिक्षा चालकांसारखंच रिक्षा चालवत आहे.
पाहा व्हिडीओ
भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात.