Puneri pati: पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या ह्या नेहमीच चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. एक पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी पुणेकरांनी या पाटीवर कुणाचा अपमान नाही केला तर एका बंद दुकानाबाहेर जाहिरात लावली आहे. एका पोस्टरवर लावलेली पुणेरी शैलीतली ही जाहिरात पाहून तुम्हीही म्हणाल, हे फक्त पुणेकरांना सुचू शकतं. या पुणेरी पोस्टरचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

तुम्ही दुकानाच्या बाहेर वेगवेगळे पोस्टर, पाट्या पाहिल्या असतील. अनेकदा बंद दुकानाबाहेरही जाहिरातीच्या पाट्या, पोस्टर लावलेले असतात. यामध्ये दुकान भाड्याने देणे आहे, गाळा भाड्याने देणे आहे. तसेच कामासाठी मुली पाहिजेत असे पोस्टर असतात. असेच पुण्यातील एका दुकानाबाहेरचं पोस्टर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे. या पोस्टरवर गाळा भाड्याने देणे आहे असं लिहलं आहे. आता तुम्ही म्हणाल यात काय विशेष ? मात्र, पुढे जे लिहिलंय ते वाचून तुम्हीही डोक्याला हात लावाल. पुढे त्यांनी संपर्क साधण्यासाठी अशा अंदाजात फोन नंबर दिला आहे की तुम्हालाही हसू आवरणार नाही.

Nagpur video
“उठा उठा दिवाळी झाली, पुणे मुंबईला जाण्याची वेळ आली” नागपूरचा VIDEO होतोय व्हायरल
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
saras baug pune diwali pahat
“आमच्याकडे सारसबाग आहे!”; काकांचा डान्स अन् तरुणांचा धिंगाणा, पुण्यातील दिवाळी पहाटचा हा व्हिडीओ पाहिलात का?
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
A Bengaluru man shared Diwali photos of women on social media without their consent and referred to the women as patakas
परवानगी न घेता महिलांचे फोटो केले शेअर, महिलांना संबोधले ‘पटाखा’; आक्षेपार्ह पोस्ट पाहून नेटकरी भडकले
woman receiving a whole set of Diwali gifts from her husband
VIRAL VIDEO : ‘प्रत्येक बायकोचं स्वप्न…’, दिवाळीनिमित्त दिलं हटके गिफ्ट; बारीक-सारीक गोष्टी लक्षात ठेवणाऱ्या नवऱ्याचं होतंय कौतुक
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…
ips funny video fake ips 95 percent lies viral video
मी IPS, ९५ टक्के खोटं बोलतो” वर्दी घातलेली व्यक्ती असं का म्हणतेय? पाहा पोट धरुन हसायला लावणारा VIRAL VIDEO

असं काय लिहलंय पोस्टरवर

तर या पोस्टरवर “गाळा भाड्याने देणे आहे, संपर्क – दोन वेळा ८० तीन वेळा ७२” असं लिहिलं आहे. अशा पद्धतीने फोन नंबर तुम्हीही पहिल्यांदाच पाहिला असेल. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “पुणेकर काय करतील आणि कुठे आपली क्रिएटिव्हिटी दाखवतील याचा नेम नाही.” तर आणखी एकानं “पुणेकरांचा नाद नाय!” अशी प्रतिक्रिया दिली आहे.

पाहा जाहीरातीचा फोटो

हेही वाचा >> VIDEO: चोराचा डाव थोडक्यात फसला; सायकल घेऊन पळ काढणार तेवढ्यात मालकानं धरली मान; चोराचं पुढे काय झालं तुम्हीच पाहा

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी, शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.