आजकाल चोरीच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. कुठे भरदिवसा चोरीच्या घटना घडत आहे. कुठे भरदिवसा चोरटे महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने किंवा पर्स घेऊन पळून जातात तर कधी मोठ्या सोसायटीमध्ये शिरून चोरी करतात. अशा घटनांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. दरम्यान असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओमध्ये एका फूड डिलिव्हरी सेवा देणाऱ्या आऊटलेटच्या डिलिव्हरी बॉयचे युनिफॉर्म परिधान करून चोरट्यांनी चोरी केली आहे. पुण्यातील एका आलिशान सोसयटीतील चोरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरातील ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका आलिशान सोसायटीमध्ये डंझो डिलिव्हरी बॉईजचे युनिफार्म घातलेल्या दोन चोरट्यांनी मौल्यवान वस्तूंची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

व्हिडीओ इंस्टाग्रामवर pune_is_loveee नावाच्या अकाऊंटवर पोस्ट केला आहे. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”पुण्यात कोरेगाव पार्क येथील Oxford Hallmark सोसायटी मध्ये फ्लॅट बाहेर असलेल्या ब्रास शोपीसची चोरी करताना दोघे Dunzoच्या गणवेशात CCTV फुटेज मध्ये दिसून आले आहे.”

हेही वाचा – प्रवाशांनी खचाखच भरलेली बस थेट पुलावरून कोसळली, २४ प्रवासी जखमी, थरारक घटनेचा Video Viral

व्हिडीओवर कमेंट करताना एकाने लिहिले की, त्यांचा टी शर्ट डंझोचा बॅग झेप्टोची आहे.”

हेही वाचा – कष्टाचं चीज झालं! भाजी विक्रेत्या मावशींचा मुलगा झाला CA, लेकाच्या गळ्यात पडून ढसाढसा रडली आई, Video Viral

फ्रीप्रेस जर्नलच्या वृत्तानुसार ऑक्सफर्ड हॉलमार्क सोसायटीमध्ये ३ एप्रिल रोजी रात्री ८:२० च्या सुमारास ही चोरी झाली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये डंझोच्या डिलिव्हरी बॉयच्या युनिफॉर्म परिधान करून चोरट्याने बिल्डिंगमध्ये वस्तू चोरत असल्याचे दिसून आले आहे. हे चोरटे गुपचूपपणे आवारात घुसले आहे. या घटनेमुळे व्यथित झालेल्या घरमालकांनी त्यांच्या शेजाऱ्यांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. “आमचे घर डंझो डिलिव्हरी कामगारांच्या वेशात आलेल्या दोन व्यक्तींनी लुटले. त्यांनी आमचे पितळाचे दागिने चोरले, व्हिडिओमध्ये कैद झाले. या घटनेमुळे आम्हाला धक्का बसला आहे. सुरक्षेच्या भीतीने कृपया सतर्क रहा आणि कोणत्याही संशयास्पद त्वरित तक्रार करा.”