Viral Video : पुणे हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय शहर आहे. पुण्यातील अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. कधी पुणेरी पाट्या तर कधी येथील ऐतिहासिक वास्तू, कधी लोकप्रिय ठिकाणे तर कधी खाद्यपदार्थांचे व्हिडीओ सुद्धा चर्चेत येतात. पुण्यात असे अनेक लोकप्रिय फूड स्टॉल आहेत जे एका विशिष्ट खाद्यपदार्थांसाठी ओळखले जातात. सध्या असाच एका आज्जीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एक ८० वर्षांची आज्जी चक्क पाणी पुरी विकताना दिसत आहे. आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेऊ या. (pune video 80 years old lady selling panipuri aaji video viral on social media)

पुण्यातील ८० वर्षांची आज्जी विकते पाणी पुरी ( 80 years old lady selling panipuri)

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पाणी पुरीचा गाडा दिसेल. या गाड्यावर एक आज्जीबाई पाणी पुरी विकताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल ती आज्जी पाणी पुरी तयार करत आहे. या आज्जीच्या गाड्याचे नाव आज्जीची पाणीपुरी असे आहे. ही आज्जी २० वर्षांपासून पाणीपुरी विकते विशेष म्हणजे आज्जी घरगुती पाट्यावरची पाणीपुरी विकते. आजीच्या गाड्यावर पाणीपुरीसह शेव पुरी, रगडा पुरी, ओली भेळ, महाराष्ट्रीयन भेळ, मटकी भेळ सुद्धा मिळते. पुण्यातील आकुर्डी परिसरात संभाजी चौकाजवळ आजी पाणी पुरी विकते.

a young guy express his feelings about todays marriage
Video : “आजच्या काळातला हुंडा म्हणजे…” तरुणाने सांगितली लग्नाची सत्य परिस्थिती, पुणेरी पाटीचा व्हिडीओ चर्चेत
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Nagin Dance aaji
साठ वर्षाच्या आजीबाईंचा नागीण डान्स पाहिला का? Viral Video पाहून पोट धरून हसाल
a beautiful sadhvi who came in mahakumbh mela became famous
Video : सुखी जीवन सोडून २८ व्या वर्षी साध्वी झालेली सौंदर्यवती चर्चेत, महाकुंभ मेळ्यातील व्हिडीओ व्हायरल
Maharashtrachi Hasya Jatra Fame Rohit Mane new car
Video : “साताऱ्याची माणसं ‘THAR’ वेडी…”, म्हणत ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्याने घेतली नवीन गाडी! सर्वत्र होतंय कौतुक
Paaru
Video: “आदित्यसरांचं नाव घेते माझ्या…”, पारूने आदित्यसाठी घेतला उखाणा; सावली, लीला व तुळजाने केले कौतुक
Video : an old couple dance on angaro ka ambar sa song in pushpa movie
Video : क्या बात! आज्जी आजोबांनी ‘पुष्पा’ गाण्यावर केला भन्नाट डान्स, नेटकरी म्हणाले, “जोडी असावी तर अशी..”
a jam-packed four-wheeler was spotted ferrying a crowd of people
VIDEO : चारचाकीला रेल्वेचा डब्बा समजलात का? प्रवासी मोजता मोजता थकाल, व्हिडीओ होतोय व्हायरल

हेही वाचा : बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : ‘२०० रुपये जास्त मागितले, माराहाण करण्याची दिली धमकी’, रिक्षावाल्याने २० वर्षीय तरुणाला छळले, धक्कादायक घटनेचा Video Viral

pcmcexplorer या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी पण गेलो होतो.. बाकी ठीक, पण आजीशी बोलूनच खूप छान वाटलं!” तर एका युजरने लिहिलेय, “आमच्या अभ्यासिकेच्या जवळ आहे” आणखी एका युजरने लिहिलेय, “आज्जी आमच्यासाठी एक प्रेरणा आहे. जर मनात प्रबळ इच्छाशक्ती असेल तर तुम्ही काहीही करू शकता त्यासाठी वय आडवं येत नाही. मित्रांनो.. तक्रारी करण्यासाठी आयुष्य पडलं आहे.. पण आजच्या तरुण पिढीने या आज्जी कडून खूप काही शिकायला पाहिजे” अनेक युजर्सनी या आज्जीचे कौतुक केले आहेत.

Story img Loader