Viral Video : सोशल मीडियावर प्रँकचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. प्रँकचे व्हिडीओ सहसा पोट धरुन हसवणारे असतात पण सध्या एक असा व्हिडीओ व्हायरल होत आहे की पाहून तुम्हाला दु:ख होईल. या व्हिडीओमध्ये भर रस्त्यावर एक तरुण मुलींना राखी बांधण्यासाठी विनंती करताना दिसतो पण एकही तरुणी त्याला राखी बांधत नाही. हा व्हिडीओ पाहून कोणीही भावूक होईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. भर रस्त्यात बहिणींना कळकळीची विनंती करत होता भाऊ येत्या काही दिवसांत रक्षाबंधन आहे. रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या स्नेहाचा आणि प्रेमाचा सण असतो. या दिवशी बहीण भावाला राखी बांधते, अशी परंपरा आहे. याच निमित्त्याने एका तरुणाने मनोरंजनासाठी एक प्रँक केला पण हा प्रँक भावूक करणारा आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की त्याने मळलेले कपडे परिधान केले आहे आणि तो रस्त्यावर ये जा करणाऱ्या तरुणींना राखी बांधण्यासाठी कळकळीची विनंती करत आहे. "ताई राखी बांध ना, ऐकना दीदी, राखी बांध ग एवढी" अशा हाका मारत तो मुलींना राखी बांधण्यासाठी विनंती करताना दिसतो पण दुर्दैवाने एकही मुलगी त्याला राखी बांधत नाही. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल. काही लोकांना हा व्हिडीओ पाहून दु:ख वाटेल. हा व्हिडीओ पुण्यात शूट केला असावा, असा अंदाज आहे. हेही वाचा : अजबच! मुंबई लोकलच्या दरवाजावर पठ्ठ्याने चिकटवला फोन अन् गाणी ऐकण्यासाठी केला ‘असा’ जुगाड, VIDEO पाहून नेटकरी म्हणाला, “डब्बा लगेज, अंकल सेवेज” पाहा व्हायरल व्हिडीओ हेही वाचा : Fandry Movie: ‘तुज्या पिरतीचा…’ बाकाच्या तालावर सादर केलं विद्यार्थ्याने गाणं; VIDEO तील ‘त्याचे’ ताल, सूर ऐकून तुम्हीही धराल ठेका prank_maza_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "आवडला आपल्याला हा प्रॅंक……चांगलाच मनाला लागला." तर एका युजरने लिहिलेय, "विश्वास आजकल कुणावर ठेवत नाहीये…कारण सध्याची परिस्थिती काही वाईट आणि विचित्र लोकांनी अशी निर्माण केलीय की माणूस हतबल होऊन जातो" आणखी एका युजरने लिहिलेय, "मनाला लागला हा व्हिडिओ, कोणी नाही बांधली तरी मी बांधेन तुला राखी. रक्षा बंधनसाठी तुला दीदी कडे यावं लागेल. ये कोल्हापूरमध्ये भावा" या व्हिडीओवर अनेक युजर्सनी मुलींनी राखी न बांधल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.