Pune Video : काही दिवसांपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. अशात पुण्यातील पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. काही व्हिडीओ अंगावर काटा आणणारे आहेत तर काही व्हिडीओ मजेशीर आहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये भर रस्त्यावर पावसाच्या पाण्यात पोहण्याचा आनंद घेताना एक तरुण दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही डोकं धराल. विशेष म्हणजे रस्त्यावरील लोक त्याला असं पोहताना पाहून अवाक् झालेले दिसत आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. (pune video a man swimming in rain water)

असं म्हणतात पुणे तिथे काय उणे! पुण्यातही काहीही घडू शकते, या आशयाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दिसून येतात पण हा व्हिडीओ पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की जोरदार पाऊस सुरू आहे. आणि रस्त्यावर पाणी साचले आहे. पावसामुळे रस्त्यावर लोक ट्रॅफिकमध्ये अडकलेली दिसत आहे. मात्र एक तरुण असं काही कृती करताना दिसतो की तुम्हालाही हसू आवरणार नाही. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की हा तरुण भर रस्त्यावर पावसाच्या पाण्यात पोहताना दिसत आहे. त्याला असे पोहताना पाहून रस्त्यावरील लोक हसताना दिसत आहे तर काही लोक त्याच्या या कृतीने अवाक् झाले आहेत. हा व्हिडीओ पुण्यातील रेल्वे स्टेशनजवळचा आहे. कदाचित फक्त रील बनवण्यासाठी या तरुणाने हा व्हि़डीओ शूट केला असावा. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहेत.

हेही वाचा : “प्रेम म्हणजे प्रेम असतं” दादर स्थानकावर प्रेयसीबरोबर कॉलवर बोलण्यासाठी तरुणाची करामत; PHOTO पाहून युजर्स म्हणाले, ‘बहुतेक ब्रेकअप

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : गावाकडची माणसं! फक्त जगण्याचा आनंद घेता आला पाहिजे; गावकऱ्यांनी सादर केले पारंपारिक नृत्य, व्हिडीओ एकदा पाहाच

@purankumawat76 या एक्स अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लोकेशन लिहिलेय, “पुणे रेल्वे स्टेशन” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. हजारो लोकांना हा व्हिडीओ पाहिला आहे.

काही दिवसांपूर्वी असाच एका तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पावसाचा आनंद लुटणारा हा तरुण भररस्त्यात साचलेल्या पावसाच्या पाण्यामध्ये खेळताना दिसला होता. हा तरुण चक्क पाण्यावर तरंगणाऱ्या जाड मॅटवर झोपलेला दिसला होता. सोशल मीडियावर त्याच्या या कृतीची चांगलीच चर्चा रंगली होती.