Pune Video : सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक तरुण पुणे ते अयोध्या पायी प्रवास करताना दिसत आहे. सध्या पुण्याच्या या तरुणाची सगळीकडे जोरदार चर्चा सुरू आहे.
पुणे हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतं. कधी येथील ऐतिहासिक वास्तू, तर कधी येथील खाद्यसंस्कृती, कधी येथील ढोल ताशा तर कधी पुणेरी पाट्या नेहमीच चर्चेचा विषय असतो. आता या पुणेरी तरुणाने सर्वांचे लक्ष वेधलेआहे कारण हा तरुण पुण्याहून अयोध्येच्या दिशेने निघाला आहे तो पायी १५०० किमीचा प्रवास करणार आहे.

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण पाठीवर बॅगचं ओझं घेऊन पायी चालताना दिसत आहे. त्याच्या हातात जय श्री राम लिहिलेला भगवा झेंडा सुद्धा आहे. त्याच्या बॅगवर एक छोटे पोस्टर सुद्धा लावले आहे. त्या पोस्टरवर ‘पुणे ते अयोध्या पायी यात्रा १५०० किमी’ असे लिहिलेले आहे. या व्हिडीओत हा तरुण याविषयी माहिती सांगताना दिसतो. पुढे तो व्हिडीओत म्हणतो, “हा माझ्या प्रवासाचा पहिला दिवस आहे. माझ्याबरोबर सौरभ नावाचा माझा एक मित्र आहे. आमचा सर्वात पहिला स्टॉप असणार आहे शिरडी. आता आपण पाहू या की शिरडीला पोहचण्यासाठी किती वेळ जाईल. या प्रवासात तुम्ही आमच्याबरोबर राहा आणि कमेंट्समध्ये फक्त जय श्री राम लिहा.”

Leopard Vasai Fort
वसई किल्ल्याजवळ प्रथमच बिबट्याचे दर्शन, वनविभागाची कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून शोधमोहीम सुरु
buldhana japan marathi news, japanese language buldhana marathi news
गरिबीच्या अंधारावर मात करत निघाली उगवत्या सूर्याच्या देशात; बकऱ्या वळणाऱ्या रमाई कन्येला जपानमध्ये लाखोंचे ‘पॅकेज’
women Forcefully married with travels businessman and stolen 17 lakhs
‘लुटेरी दुल्हन!’ ट्रॅव्हल्स व्यापाऱ्याशी बळजबरी लग्न, १७ लाख उकळले
Pune history do you see photo of Khajina Vihir in pune 1942 photo goes viral on social media
Pune : आठवणीतले पुणे! पुण्याच्या खजिना विहीरीचा फोटो पाहिला का? १९४२ चा जूना फोटो व्हायरल

हेही वाचा : Video: दिल्लीत मुलांची वाट पाहणाऱ्या बापावर गायीचा प्राणघातक हल्ला; रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू

कोण आहे हा तरुण?

हर्षल घवारे असे या तरुणाचे नाव आहे. त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या बायोमध्ये लिहिल्याप्रमाणे तो एक इन्फ्लुअन्सर, अभिनेता आणि मॉडेल आहे. harshalghaware.02 नावाचे त्याचे इन्स्टाग्राम अकाउंट आहे आणि त्याचे इन्स्टाग्रामवर असंख्य फॉलोवर्स आहेत. याच इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याने व्हिडीओ शेअर केला आहे त्या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणे ते अयोध्या” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी ‘जय श्री राम’ लिहिलेय.