Viral Video : सोशल मीडियावर पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी पुणेरी पाटी चर्चेत येते तर कधी येथील पुणेरी लोक चर्चेत येतात. कधी येथील ऐतिहासिक वास्तुविषयी बोलले जाते तर कधी येथील खाद्य संस्कृतीची चर्चा होते. पुण्यातील शिक्षण, ऐतिहासिक वास्तु व प्राचीन मंदिरे, येथील लोकप्रिय ठिकाणे आणि शहरात घडणाऱ्या अनोख्या गोष्टी नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होतात.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील रिक्षावाल्याचा अनोखा जुगाड दाखवला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की रिक्षामध्ये वायपर ब्लेडचा लाभ घेता यावा, यासाठी तरुणाने अनोखा जुगाड केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुण ऑटोरिक्षा चालवत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे. त्यामुळे ऑटोरिक्षाच्या समोरच्या काचेवर कधी पावसाचे पाणी पडते तर कधी काचेवर धुके साचते. ज्यामुळे रस्ता नीट दिसत नाही. त्यासाठी कारमध्ये वायपर ब्लेडचा वापर केला जातो पण या तरुणाने चक्क ऑटोमध्ये वायपर ब्लेड वापरता यावा, म्हणून अनोखा जुगाड केला आहे. त्याने दोरीच्या मदतीने वायपर ब्लेड तयार केला आहे. ऑटो चालवताना तो दोरीच्या साहाय्याने काच स्वच्छ करतो. तरुणाचा हा जुगाड पाहून कोणीही अवाक् होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “हे फक्त पुण्यातच घडू शकते.” सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
mangesh.gole या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “उगाच म्हणत नाही पुणे तेथे काय उणे..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “पुणे तिथे काय उणे” तर एका युजरने लिहिलेय, “दीड शहाणे जुगाडू पुणेकर” आणखी एका युजरने लिहिलेय, “वेळ आली की करावा लागतो असा जुगाड, माझ्या कारचे वायपर बंद पडले होते मुंबई पुणे एक्स्प्रेसवेला पावसात. मी पण असाच जुगाड करून गाडी पावसात आणली.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
© IE Online Media Services (P) Ltd