Pune Video : पुणे हे एक महाराष्ट्रातील असं शहर आहे, ज्या शहराला तुम्ही एकदा भेट दिली की तुम्ही या शहराच्या प्रेमात पडता. येथील संस्कृती, ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, भाषा इत्यादी गोष्टी या शहराची ओळख आहे. दर दिवशी हजारो लोक पुणे दर्शनाला येतात आणि येथील संस्कृती जाणून घेतात. पुण्यातील खाद्यसंस्कृती सु्द्धा तितकीच लोकप्रिय आहे. तुम्हाला येथे प्रत्येक प्रकारचे पदार्थ दिसून येईल.

पुण्याच्या खाद्यसंस्कृतीमध्ये मिसळ चा मोठा वाटा आहे. मिसळ शिवाय तुम्ही पुण्यातील खाद्यसंस्कृतीविषयी बोलू शकत नाही. कारण पुण्यातील मिसळ विशेष लोकप्रिय आहे. तुम्ही पुण्यात आला आणि मिसळ खाल्ली नाही, तर काय मजा? पण तुम्हाला पुण्यातील लोकप्रिय मिसळ माहितीये का? आज आपण पुण्यातील पाच प्रसिद्ध मिसळ विषयी जाणून घेणार आहोत. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील पाच मिसळविषयी सांगितले आहे.

Pune Video
Pune Video : “पुण्यासारखं सुख कुठेच नाही!” एकदा हा व्हायरल व्हिडीओ पाहाच
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
unhygienic vegetables frozen matar shocking video goes viral on social media
आता तर हद्दच झाली! वाटाणे पाण्यात टाकताच काय झालं पाहा; VIDEO पाहून सोललेले वाटाणे घेताना शंभर वेळा विचार कराल
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं; म्हणाले…
Traffic jam in pune city due rush for Diwali 2024 shopping Shocking video
पुणेकरांनो दिवाळीच्या खरेदीला मंडईत जाताय? ‘हा’ VIDEO पाहून घरातून बाहेर येण्याआधी शंभर वेळा विचार कराल
Malkin Bai Written behind Car form Pune
प्रेम करावं तर पुणेकरांसारखं! मालकीणबाईसाठी काहीपण, Video Viral एकदा बघाच

हेही वाचा : भारतीय फोटोग्राफरने काढलेला सुंदर फोटो शेअर करत Appleचे सीईओ टीम कुक यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा; पाहा, पोस्ट होतेय व्हायरल

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील पाच मिसळ विषयी सांगितले आहे. या व्हिडीओत पुण्यातील पाच वेगवेगळ्या परिसरातील लोकप्रिय मिसळविषयी माहिती सांगितली आहे. व्हिडीओत मिसळचे लोकेशन दाखवले आहे आणि तेथील मिसळची सुद्धा एक झलक दाखवली आहे.
त्या पाच मिसळ खालील प्रमाणे –
दर्पण मिसळ, रविवार पेठ, पुणे<br>चंद्रविलास उपहार गृह, कुमठेकर रोड, पुणे
रामनाथ कोल्हापुरी मिसळ, टिळक रोड, पुणे
आप्पा मिसळवाले (भीड), नाना पेठ, पुणे
झकास मिसळ, सदाशिव पेठ, पुणे

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : इथे माणुसकी मेली! पतीचा गोळीबारात मृत्यू, गरोदर पत्नीला रक्त साफ करण्यास भाग पाडलं; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

foodland.pune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुण्यातील या पाच मिसळ तुम्ही खायलाच पाहिजे” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “एकदा श्रीराम मिसळ, लोणी काळभोर ला जाऊन बघा. मी एवढी झकास मिसळ कुठेच नाही खाल्ली पुण्यात.” तर एका युजरने लिहिलेय, “रामनाथ आणि आप्पा मिसळ ठीक आहे तर तुम्ही पद्मावतीची खंडाळे मिसळ टेस्ट करा. टॉप मिसळ कशाला म्हणतात ते कळेल.” आणखी एका युजरने पुण्यातील चांगल्या मिसळचे नावं लिहिलेय, “पुणे..
आब्बा मिसळ..रास्ता पेठ, श्रीकृण मिसळ..तुळशी बेल बाग, वैद्य मिसळ..रविवार पेठ, बेडेकर मिसळ.. लक्ष्मी रोड. महेश लंच मिसळ.. भवानी पेठ,
वाडेश्वर मिसळ..भवानी पेठ गोकुळ तालीम.” अनेक युजर्सनी त्यांच्या आवडीच्या मिसळची नावं लिहिली आहेत.

Story img Loader