Pune Viral Video : पुणे हे ऐतिहासिक व महाराष्ट्रातील सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते. पुण्यात असे अनेक ठिकाणे आहेत, जे बघण्यासाठी लोक गर्दी करतात. येथील ऐतिहासिक वास्तू, प्राचीन मंदिरे, किल्ले या शहराची ओळख आहे. पुण्याच्या आजुबाजूला हिरवागार निसर्ग लाभलेला आहे. पुण्यापासून काही अंतरावर असे अनेक निसर्गरम्य ठिकाणे आहेत. सोशल मीडियावर अनेकदा या ठिकाणचे व्हिडीओ व्हायरल होतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये सुंदर नदी व हिरवागार परिसर दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही या ठिकाणी एकदा जावं असे वाटेल.
हा व्हायरल व्हिडीओ एका तरुणाने शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला समोर सुंदर नदी दिसेल आणि या नदी शेजारी हिरवेगार झाडे दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला हा तरुण या नदी शेजारी निवांत बसलेला दिसेल.हा सुंदर परिसर पाहून हे ठिकाण नेमके पुण्याजवळ कुठे आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल? तर हे सुंदर ठिकाण अगदी पुण्याजवळ आहे. हा पुण्याजवळ असलेला मुळशी तलाव आहे आणि या तलावाच्या आजुबाजूचा हा परिसर आहे. या व्हिडीओवर लिहिलेय, “रिलॅक्स होण्यासाठी पुण्याजवळचे सर्वात चांगले ठिकाण.”
हेही वाचा : “ओ स्त्री कल फिर आना” दुकानाच्या पाटीवर लिहिली टॅगलाईन, दुकान मालकाची मार्केटिंग स्टाइल पाहून व्हाल अवाक्
पाहा व्हायरल व्हिडीओ
omees_picturesque या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “मुळशी तलाव, पुणे सह्याद्री”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी या व्हिडीओवर लोकेशन विचारले आहे. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “असा बोलून बोलून अर्धा भारत पुण्यातच रिलॅक्स आणि चिल करतोय.” तर एका युजरने लिहिलेय, “आता हे ठिकाण बंद केले आहे”
पुण्याजवळ असे अनेक ठिकाणे आहेत, जे अतिशय निसर्गरम्य आहेत आणि बऱ्याच लोकांना अजुनही माहीत नाही. काही दिवसांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये पुण्याजवळच्या एका अशा ठिकाणाविषयी माहिती सांगितली होती की ज्या ठिकाणाहून पुणे शहराचे सुंदर दृश्य दिसते. बोपदेव घाटातील तो व्हिडीओ होता. निसर्गरम्य ठिकाण म्हणून बोपदेव घाट लोकप्रिय आहे. अनेक लोक रोजच्या कामाचा कंटाळा आला की बोपदेव घाटाकडे धाव घेतात आणि निसर्गरम्य ठिकाणी मोकळा श्वास घेतात.