Pune Video : सध्या गणेशोत्सव सगळीकडे उत्साहात साजरा केला जात आहे. ठिकठिकाणी गणपतीच्या मूर्ती आणि देखावे दिसत आहे. सोशल मीडियावर तर एकापेक्षा एक सुंदर देखाव्यांचे व्हिडीओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक देखाव्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील एका मंडळाने चक्क वृंदावनचा सुंदर देखावा सादर केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की जणू वृंदावन पुण्यात आले आहे. (Vrindavan Dekhava in Pune Ganeshotsav Stunning Decoration Video Goes Viral)

पुणे हे गणेशोत्सवासाठी अतिशय लोकप्रिय आहे. पुण्यातील गणपती बघण्यासाठी लोक दुरवरून येतात. येथील गणेशोत्सवातील गणपतीचे डेकोरेशन आणि देखावे अतिशय सुंदर व आकर्षक दिसतात. या व्हायरल व्हिडीओमध्ये पुण्यातील एका मंडळाचा देखावा दाखवला आहे. वृंदावनचा सुंदर देखावा पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओमध्ये वृंदावनमधील संपूर्ण परिसर दाखवला आहे. हा देखावा पाहिल्यानंतर क्षणभरासाठी तुम्हाला वृंदावनमध्ये गेल्यासारखे वाटेल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हा सुंदर देखावा सदाशिव पेठेतील शनिपार चौक मंडळाचा आहे.

हेही वाचा : Bihar Viral Video: ट्रेनला उशीर झाल्यामुळे आत्महत्या करायला गेलेली तरुणी रुळावरच झोपली, पुढे काय झालं?

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : बाप्पा सर्वांना आपला वाटतो! गणपतीच्या मूर्तीकडे एकटक पाहत होती महिला अन् अचानक डोळे भरून आले, पाहा भावुक करणारा VIDEO

puneri_prem या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “वृंदावन आलंय आपल्या पुण्यात.” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मी पाहिला आहे, खूप सुंदर आहे.” तर एका युजरने लिहिलेय, “गणपती बाप्पा मोरया” आणखी एका युजरने लिहिलेय, “सुंदर देखावा केलाय, आम्ही जाऊन आलो शनिपार मंडळ.”

पुण्यातील असाच एक आणखी सुंदर देखाव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. छत्रपती राजाराम मित्र मंडळाचा यंदाचा भव्य दिव्य दिखावा चर्चेचा विषय ठरला आहे. या मंडळाने पंजाबमधील सुंदर दुर्गियाना मंदिर साकारले आहे. हे मंदिर पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्याचबरोबर यंदा दगडूशेठ मंदिराच्या सजावटीसाठी आशियातील सर्वात उंच जटोली शिवमंदिर साकारले. यंदा पुण्यातील गणपतीबरोबर देखावे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे. त्यामुळे तुम्ही जर गणपती बघायला पुण्यात जायचा विचार करत असाल तर काही लोकप्रिय देखावे पाहणे, विसरू नका.