Pune Video : नुकताच गणेशोत्सव सगळीकडे साजरा करण्यात आला आहे. दहा दिवसांच्या वास्तव्यानंतर बाप्पानी सर्वांचा निरोप घेतला आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी गणेशजीचा विसर्जन सोहळा जल्लोषात साजरा करण्यात आला. ठिकठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. ढोल ताशाच्या गजरात बाप्पााला निरोप दिला. या मिरवणुकीचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशाच एका व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधले आहे कारण या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की बाप्पाच्या एका विसर्जन मिरवणुकीत डेकोरेशनला अचानक आग लागली. सध्या हा व्हायरल व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (pune video Ganapati decoration on Lakshmi Road suddenly caught fire during Ganpati visarjan miravnuk in pune watch viral video what happened next)

गणपती डेकोरेशनला अचानक लागली आग

हा व्हायरल व्हिडीओ पुण्यातील आहे आणि हा लक्ष्मी रोडचा गणपती आहे. याली लक्ष्मी रोडचा गणपती सुद्धा म्हणतात. रस्त्यात मिरवणुकीदरम्यान या गणपतीच्या डेकोरेशनला अचानक आग लागते आणि एकच गोंधळ उडतो. सर्व जण आग विझवण्याचा प्रयत्न करतात. जो तो पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करतो. एक व्यक्ती डेकोरेशनच्या ज्या भागाला आग लागली आहे तो भाग काढून टाकण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी आग विझवली जाते. त्यानंतर सर्व जण ‘गणपती बाप्पा मोरया’ असे जोरजोराने जयघोष करताना दिसतात.

Anand mahindra shared this special heart touching video
घरात मुलगी असणाऱ्या प्रत्येकानं पाहावा असा VIDEO; आनंद महिंद्रांनी शेअर केलेला व्हिडीओ पाहून डोळ्यांत येईल पाणी
4th October Rashi Bhavishya in marathi
४ ऑक्टोबर पंचांग: मेष, वृषभसह ‘या’ राशींवर देवी…
Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
bus driver enjoy dance during ganpati visarjan 2024 video
ड्रायव्हर जोमात, पॅसेंजर कोमात; गणपती विसर्जन मिरवणुकीतील त्यांचा डान्स VIDEO पाहून तुम्हाला काय वाटतं?
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य पुन्हा येईल, अशी स्थिती…”; शरद पवारांचं वक्तव्य चर्चेत
Nitin Gadkari
Nitin Gadkari : १९०० कोटींमध्ये रस्ता बांधून ८००० कोटी टोल का वसूल केला? नितीन गडकरींना थेट प्रश्न, हिशेब सांगत म्हणाले…
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Puneri Aunty teach lesson to Bike Riders on Footpath Video Wins Hearts netizen love it
“पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, पुलाच्या पदपथावर दुचाकी चालणार्‍यांना पुणेरी काकूंनी घडवली अद्दल, पाहा Viral Video

हेही वाचा : काकांचा जबरदस्त डान्स! डोक्यावर बाप्पाची मूर्ती घेऊन काकांनी धरला ठेका, कोकणातील गणरायाच्या विसर्जनाचा VIDEO VIRAL

पाहा व्हिडीओ (Viral Video)

हेही वाचा : Mumbai Police Band Video: मुंबई पोलिसांच्या बँडचा बाप्पाला संगीतमय निरोप; ऐका ‘खाकी स्टुडिओ’चं श्रवणीय सादरीकरण

ravi_cinema या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “लक्ष्मी रोडचा राजा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “उगाच शोबाजी करायला कोणी सांगितलं होतं नीटपणे आणा गणपती आणि नीटपणेच विसर्जनाला घेऊन जा.” तर एका युजरने लिहिलेय, “डेकोरेशन विचार करून करावे, आपल्या Reel च्या हट्टापायी बाप्पाच्या मूर्ती ला काही होईल असे काही करू नये ही विनंती.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मी याठिकाणी मागच्या बाजूला होतो, आरतीनंतर फटाके फोडले त्यामुळे आग लागली” एक युजर लिहितो, “टिळक आम्हाला क्षमा करा.” तर एका युजर लिहितो, “विघ्नहर्ता”