Pune Viral Video : पुण्यातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी ऐतिहासिक वास्तुचे व्हिडीओ तर कधी प्राचीन मंदिराचे व्हिडीओ, कधी पुणेरी पाट्यांचे मजेशीर व्हिडीओ तर कधी येथील वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे व्हिडीओ चर्चेत येतात. एवढंच काय तर पुणेरी लोकांचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. पुण्यातील रिक्षाचालकांचे सुद्धा अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. सध्या असाच एका रिक्षाचालकाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत पुण्यातील रिक्षाचालक किती सुसंस्कृत आहेत, हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Pune Video : heartwarming video of a Pune rickshaw driver showing kindness by telling a passenger to pay later)
हा व्हायरल व्हिडीओ एका चालत्या रिक्षेतील आहे. एका प्रवासी महिलेने हा व्हिडीओ शूट केला आहे. या व्हिडीओमध्ये रिक्षाचालक व प्रवासीमधील संभाषण ऐकू येते. हे संभाषण त्यांनी हिंदी भाषेत केले आहे.
प्रवासी – हे घ्या पैसे
रिक्षाचालक – याचे सुट्टे पैसे नाही माझ्याकडे
प्रवासी – मग तुम्ही मला तुमचा नंबर द्या. मी तुम्हाला युपीआय करते.
रिक्षाचालक – युपीआय होऊ शकणार नाही. बँक ट्रान्सजॅक्शनमध्ये समस्या येते. येथेच राहतात ना तुम्ही, नंतर कधी द्याल.
हा व्हिडीओ पाहून तुम्हाला या रिक्षाचालकाचा मोठेपणा दिसून येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, “एक पोस्ट पुण्यातील रिक्षावाल्यांसाठी! तुम्ही पुण्यातील रिक्षावाल्यांबरोबर बिंदास रात्रीचा प्रवास करू शकता. अगदी तुम्ही पुण्यात नवीन असाल तरीही. एक वेळेस ते अशिक्षित असतील ही पण ते सुसंस्कृत आहेत.”
पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)
avantika_beauty_studio_600 आणि suvarn837 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “धन्यवाद .. कोणी तरी आमच्या मधल्या प्लस पॉइंट विषयी बोलले …” तर एका युजरने लिहिलेय, “विश्वास हा खूप महत्त्वाचा आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “बाकी सगळे ठिक आहे परंतु मराठी भाषा मात्र विसरत चालले मराठी लोक”