Pune Viral Video : सध्या पावसाळा सुरू आहे. सगळीकडे मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पुणे मुंबईसारख्या मोठ्या शहरातील व्हिडीओ युजर्सचे लक्ष वेधून घेताहेत. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे.हा व्हिडीओ पुण्यातील आहे. व्हिडीओमधील रस्त्याची वाईट अवस्था पाहून तुम्हीही चकीत व्हाल. या व्हायरल व्हिडीओमध्ये रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचलेले दिसत आहे. पाणी साचलेल्या अशा रस्त्यांवरून अनेकदा वाहनांचा अपघातही होऊ शकतो. (pune video heavy rain exposed potholes filling with rainwater on the hinjewadi wakad service road) हिंजवडी वाकड सर्व्हिस रोडवरील व्हिडीओ व्हायरल या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला हिंजवडी वाकड सर्व्हिस रोड दिसेल. रस्त्यावर खूप सारे खड्डे दिसत असतील आणि या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेले दिसत आहे.या रस्त्यावर वाहनांची रेलचेल सुरू आहे. पाण्याने भरलेल्या खड्ड्यातून वाहने जाताना दिसताहेत. पुण्यासारख्या मोठ्या शहरात रस्त्यांची ही अवस्था पाहून कोणीही अवाक् होईल. या व्हिडीओवर लिहिलेय, "हिंजवडी - वाकड सर्व्हिस रोड अवस्था" सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. हेही वाचा : नक्की आई कोण तेच समजेना? माय-लेकीचा तमिळ गाण्यावर जबदरस्त डान्स पाहून नेटकरी गोंधळात; VIDEO पाहून तुम्हीही व्हाल अवाक् पाहा व्हायरल व्हिडीओ pune_is_loveee या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "इनकम टॅक्स भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२४. तुमच्या भागातल्या रोडची अवस्था कशी आहे.." या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी संताप व्यक्त केला आहे. एका युजरने लिहिलेय, "हा व्हिडीओ शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आम्ही दररोज याचा सामना करतो. ६ महिन्यांत ३ ते ५ वेळा या रस्त्याची डागडुजी करण्यात आली पण भ्रष्टाचारामुळे पुन्हा खड्डे पडले" तर एका युजरने लिहिलेय, "माझी रिक्षा पलटी झाली असती या ठिकाणी" आणखी एका युजरने लिहिलेय, "पीसीएमसीने पाण्याची योग्य विल्हेवाट करण्यासाठी योजना आखली पाहिजे" हेही वाचा : Video: २२ वर्षीय तरुणाची महिन्याची कमाई ऐकून अशनीर ग्रोवर यांना धक्काच बसला; म्हणाले, “तू आमच्या जागी बसायला हवं” हिंजवडी वाकड चिंचवड शहरातील आयटी हब व उच्चभ्रू परिसर ओळखला जातो. आयटी कंपन्यांमुळे या रस्त्यांवर वाहनांची रेलचेल सुरू असते. अशात अशा रस्त्यांमुळे वाहनचालकांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.