Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील एक ऐतिहासिक शहर म्हणून ओळखले जाते. येथील ऐतिहासिक वास्तू, गडकिल्ले, खाद्यसंस्कृती नेहमी चर्चेचा विषय ठरतात. येथील पुणेरी पाट्या तर नेहमी सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अनेकदा या पाट्यावरील संदेश वाचून पोट धरून हसायला येते. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये एका ऑटो रिक्षा चालकाने त्याच्या ऑटोरिक्षेच्या मागच्या बाजूला एक पुणेरी पाटी लावली आहे. या पाटीवरील संदेश वाचून तुम्हीही अवाक् व्हाल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. (Pune video punekar auto rickshaw driver express grief puneri pati on auto rickshaw) ऑटोरिक्षावर काय लिहिलेय ? या ऑटो रिक्षा चालकाने त्याच्या ऑटोच्या पाठीमागे एक संदेश लिहिला आहे. यावर लिहिलेय,"हमें तो लुटा OLA UBER नेRapido में कहा दम थाहमें जहाँ भेजा वहाँ काभाडा ही कम था.. - पुणेरी पाटी हा संदेश पाहून तुम्हालाही पोट धरून हसायला येईल. ऑटो चालकाने या पाटीवरून त्याची व्यथा मांडली आहे. त्याने यातून त्याचे दु:ख व्यक्त केले आहे. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. हेही वाचा : PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल पाहा व्हायरल व्हिडीओ sopp_navh_may या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, "रिक्षाचालकाचे दु:ख. सलाम तुला भावा" तर एका युजरने लिहिलेय, "मी ही रिक्षा पाहिली आहे पुण्यात" आणखी एका युजरने लिहिलेय, "शंभर टक्के खरंय." अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. हेही वाचा : VIDEO: “एका रात्रीत अर्धी मुंबई रिकामी करायची ताकद” वाहनांची प्रचंड गर्दी; मुंबई-गोवा हायवेवर लोक रस्त्यावर उतरले यापूर्वी सोशल मीडियावर रिक्षाचालकाचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी उष्णतेपासून संरक्षणासाठी रिक्षाचालकाचा भन्नाट असा देशी जुगाडचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याने त्याच्या रिक्षाचं छत गोणीने पूर्णपणे झाकले होते. ही गोणी खाली पडू नये म्हणून त्यानं त्यांना चांगल्या रीतीनं बांधलंही होतं . एवढंच नाही तर या गोण्यांमध्ये वाढलेलं गवतही दिसून आलं होतं. त्यामुळेच ही रिक्षा एकदम वेगळी दिसत होती. या रिक्षाचा व्हिडीओ लोकांना खूप आवडला होता.