Viral Video : सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. येथील पुणेरी पाट्या, ऐतिहासिक वास्तूंचे व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. पुणेकरांचे व्हिडीओ सुद्धा व्हायरल होतात. तुम्ही आजवर पुणेकरांवर अनेक मीम्स, ज्योक्स वाचली असतील. अनेकदा पुणेकरांचे व्हिडीओ मजेशीर व्हिडीओ पाहिले असतील पण सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, पुणेकरांचा विषयच वेगळा आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये दुचाकी चालवणारे दोन तरुण एका चारचाकी चालकाला मदत करताना दिसत आहे. एका बंद पडलेल्या कारला पुढे नेण्यासाठी हे दोन दुचाकी चालक मदत करताना दिसतात.

या व्हायरल व्हिडीओ पु्ण्याच्या एका रस्त्यावरील आहे. व्हिडीओत तुम्हाला एक चारचाकी गाडी दिसेल. या चारचाकीच्या मागे दोन दुचाकी दिसतील. दुचाकीवर बसलेले तरुण पायाने चारचाकीला धक्का देताना दिसत आहे. बंद पडलेल्या चारचाकीला पुढे जाण्यासाठी मदत करताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या व्हिडीओवर कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकरांचा विषयच वेगळा आहे, मदतीच्या बाबतीत.”
भर रस्त्यावर दुचाकीवर बसून पायाने चारचाकीला धक्का देणे, हे धोकादायक आहे. त्यामुळे अशी मदत करताना खूप काळजीपूर्वक करावी.

attack on mumbai police, Funeral Dispute, mumbai police, attack on mumbai police in Mulund, Six Arrested,
मुंबई : भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाचा हल्ला, मुलुंडमधील घटना
A group of people Make A human chain to rescue a dog stuck in a water reservoir watch this heartwarming Viral video
पाण्यात अडकलेल्या श्वानाला वाचवण्यासाठी तारेवरची कसरत; एकमेकांचा धरला हात अन्… VIDEO तून पाहा मानवी साखळीचे बळ
Policeman escapes with bribe money in bhiwandi
ठाणे : लाचेची रक्कम घेऊन पोलीस कर्मचाऱ्याचे पलायन
leopard attacked on farmer in wardha
थरार! शेतकऱ्याचा हल्ला अन् चवताळलेल्या बिबट्याकडून पाठलाग…
son-in-law, kidnap, marriage,
लग्नाचा खर्च परत मिळविण्यासाठी जावयाचे अपहरण
rahul gandhi latest news
काफी गर्मी है! उन्हामुळे त्रासलेल्या राहुल गांधींनी भर सभेत डोक्यावर ओतलं थंड पाणी; पाहा व्हिडीओ
theft, girl, Andheri, fake,
चोरी दडवण्यासाठी कल्याणमध्ये अंधेरीतील तरुणीने रचला ॲसिड फेकल्याचा बनाव
Blood Samples
Pune Porsche Accident : अल्पवयीन मुलाच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, अपघातानंतर वडिलांनी केला होता फॉरेन्सिक प्रमुखाला फोन

हेही वाचा : रस्ता ओलांडताना चिमुकलीचं ‘हे’ कृत्य पाहून आनंद महिंद्राही इम्प्रेस; VIDEO शेअर करीत म्हणाले की, ‘संपूर्ण जग…’

पाहा व्हिडीओ

हेही वाचा : पासवर्ड कधीही चोरीला जाणार नाही! दिल्ली पोलिसांनी सांगितला अनोखा जुगाड, VIDEO एकदा पाहाच

ek_puneri या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पुणेकर” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “आम्ही मूळ बीडचे.. पण पुण्यात आलो आणि पुण्याने खूप काही दिले. जेवढं प्रेम आमचे बीड वर आहे तेवढंच पुण्यावर पण आहे. बीड आणि पुणे आमच्यासाठी खूप जिव्हाळ्याचा विषय आहे.” तर काही युजर्सनी त्यांचे अनुभव सांगत लिहिलेय की पुणेकर मदत नाही आणि त्यावरही काही पुणेकरांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.