Pune Video : पुणे हे महाराष्ट्रातील लोकप्रिय शहर आहे. पुण्याला अनेक नावाने संबोधले जाते. कधी 'ऐतिहासिक शहर' तर कधी 'महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी', कधी 'विद्येचे माहेर घर' तर कधी 'पुर्वेकडील ऑक्सफर्ड' म्हणून ओळखले जाते. खरं तर येथील ऐतिहासिक वास्तू, नाट्यगृहे, प्राचीन मंदिरे, पुणेरी पाट्या, शिक्षण, पुणेरी भाषा, खाद्यसंस्कृती नेहमी चर्चेत असतात. दरवर्षी हजारो तरुण तरुणी शिक्षणासाठी पुणे शहरात येतात. त्यातल्या काहींना पुणे एवढं आवडतं की येथेच स्थायिक होतात. पुण्यात असे कितीतरी लोक आहेत जे एकदा पुण्यात आले आणि कायमचे पुणेकर झाले.सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये पुण्यातील काही खास ठिकाणांचे दृश्य दाखवले आहेत आणि जगात पुण्यासारखे शहर नाही, असे सांगितले आहे. "जग फिरून या पण पुण्यासारखं शहर नाही…" या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला पुण्यातील रस्ते, पूल , काही फेमस ठिकाणे, हिरवा निसर्ग, पीएमटी बस असे अनेक ठिकाणे दाखवली आहेत. जर तुम्ही पुणेकर असाल किंवा पुणे शहरात राहत असाल तर तुम्हाला ही ठिकाणे ओळखता येईल. या व्हिडीओवर लिहिलेय, "जग फिरून आलो पण पुण्यासारखं शहर नाही" हा व्हिडीओ पाहून काही लोक भावूक होतील तर काही लोकांना जुने दिवस पुन्हा आठवतील. हेही वाचा : Cab Driver : भारताबाबत अपशब्द वापरणाऱ्या पाकिस्तानी माणसाला टॅक्सी चालकाने उतरवून हाकललं, कुठे घडली घटना? पाहा व्हायरल व्हिडीओ iloovepune या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, "हो खरंय" तर एका युजरने लिहिलेय, "फक्त पुणेकरच समजू शकतो." या व्हिडीओवर काही युजर्सनी टीका केली आहे. तो लिहितो, "हेच असं पण लिहू शकत होता की संपूर्ण जागा फिरून आलो पण माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांटा महाराष्ट्र सारखा दुसरा स्वराज्य नाही." सोशल मीडियावर पुण्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी पिएमटीच्या बसचा व्हिडीओ तर कधी येथील लोकप्रिय ठिकाणांचा व्हिडीओ नेहमी चर्चेत येतात. येथील लोकप्रिय खाद्य पदार्थांचे व्हिडीओ तर सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. कोणी सोशल मीडियावर पुण्याच्या पाट्यांच्या गमती जमती सांगतात तर कोणी येथे पुणेरी लोकांचा स्वभावाचं वर्णन करतात. कधी पुण्याचे गणपती तर कधी पुण्याचा ढोलताशा चर्चेत येतो. पुणे हे नेहमीच चर्चेत असलेले शहर आहे.