कन्नड सिनेसृष्टीतील सुपरस्टार अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एक अशी त्यांची ओळख होती. वयाच्या ४६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अनेकांनी अभिनेते पुनीत राजकुमार यांच्याबद्दलच्या आपल्या भावना सोशल मीडियावर मांडल्या. त्यांच्या चाहत्यांनी त्यांच्या आठवणीत टाकलेले त्यांचे जुने डायलॉगचे व्हिडीओ, फोटो आता सर्वत्र व्हायरल होत आहेत. दरम्यान असाच एक मानला चटका लागून जाणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. काय आहे व्हिडीओमध्ये? तेज नावच्या एका ट्विटर वापरकर्त्याने आणि पुनीत राजकुमार यांच्या चाहत्याने 'पुनीत राजकुमार यांचा स्वतःचा ऑनस्क्रीन संवाद आज खरा ठरला' अशा कॅप्शनसह एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात पुनीत राजकुमार बोलतांना दिसतात की "आपलं एकच आयुष्य आहे.. आज काय होईल कळत नाही.. उद्या काय होईल माहीत नाही, आपण कुठे खातो, आपण काय खातो असं सगळ त्याने (देवाने) लिहून ठेवलेलं असतं… आपल्या नशिबात.. आपण ते वगळू शकत नाही." ( हे ही वाचा: Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” ) ( हे ही वाचा: हृदयविकाराचा झटका म्हणजे काय? ज्यामुळे झालं कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमार यांचे निधन ) पुनीत यांना काल (शुक्रवारी २९ ऑक्टोबर) दुपारी १ ते १.३० च्या सुमारास हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यानंतर त्यांना तातडीने बंगळुरुतील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात (आयसीयू) उपचार सुरु होते. रुग्णालयातील डॉक्टरांचे एक पथक त्याच्यावर सतत नजर ठेवून होते. मात्र त्यानंतर त्यांची प्रकृती खालवत गेली. बंगळुरुमधील विक्रम रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दरम्यान त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली असा परिवार आहे.