Viral Video : सोशल मीडियावर दरदिवशी अनेक प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ मजेशीर असतात तर काही व्हिडीओ थक्क करणारे असतात. कधी कोणी डान्स करताना दिसतो तर कधी कोणी गाणी म्हणताना दिसतो. कधी कोणी भयानक स्टंट करताना दिसतो तर कधी कोणी हटके जुगाड सांगताना दिसतो. काही लोक तर लोकप्रिय होण्यासाठी वाट्टेल ते करतात. सध्या असाच एका तरुणीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही तरुणी बेशिस्तपणे रस्त्यावरून दुचाकी चालवताना दिसत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हालाही संताप येईल. सध्या हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
पुणेकर तरुणीचा भररस्त्यावर हुल्लडपणा!
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुणी दिसेल. ही तरुणी अत्यंत बेशिस्तपणे रस्त्यावर दुचाकी चालवताना दिसत आहे. व्हिडीओत तुम्हाला दिसेल की ही तरुणी चक्क पीएमटी बसच्या अगदी समोर दुचाकी चालवत आहे आणि दुचाकी चालवताना ती हँडलवरून दोन्ही हात सोडते. काही डान्स स्टेप्स सुद्धा करते. विशेष म्हणजे या तरुणीच्या मागे पीएमटी बस आहे.
हा एकमेव व्हिडीओ नाही ज्यामध्ये ती धावत्या पीएमटीसमोर दुचाकीवर स्टंटबाजी करत नाही. यापूर्वी सुद्धा तीने असे अनेक व्हिडीओ शूट केले आहे की ज्यामध्ये ती पीएमटीसमोर दुचारी चालवत स्टंटबाजी करताना दिसत आहे. तसेच तिच्या अकाउंटवर असे अनेक व्हिडीओ आहे ज्यामध्ये ती रस्त्यावर बेशिस्तपणे गाडी चालवताना दिसत आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
madhavi_kumbhar_raje_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे व्हिडीओ शेअर करण्यात आले असून या व्हिडीओंवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.एका युजरने लिहिलेय, “बसला जाऊ द्या ताई” तर एका युजरने खोचकपणे टोला लगावला आहे, “पुणेकरांची ओळख : हेलमेट बीना गाडी चालवणे माझा जन्म सिद्ध अधिकार आहे, आणि तो मी गाजवणारच.” आणखी एका युजरने लिहिलेय, “काय चालु आहे काही कळत नाही तरी असे लोक लोकप्रिय होतात.” एक युजर लिहितो, “बाई मागे हायवे आहे बरं का जरा जपून”
या तरुणीचे नाव माधवी कुंभार असून तिला इन्स्टाग्रामवर १.९ मिलियन लोक फॉलो करतात.