पुणे तिथे काय उणे म्हणतात ते उगाच नाही. “पुणे तिथे काय उणे” म्हणजे पुण्यात कशाचीही कमतरता नाही. पुणे हे सांस्कृतिक, शैक्षणिक, औद्योगिक आणि पर्यटनाच्या दृष्टीने परिपूर्ण शहर असल्याने तिथे सर्व काही उपलब्ध आहे, या अर्थाने पुण्याचे वर्णन करताना ही म्हण वापरली जाते. पुण्यामध्ये शिक्षण (विद्यापीठ), संस्कृती, खाद्यसंस्कृती (मिसळ, बाकरवडी), आणि निसर्ग (डोंगर, नद्या) या सर्व गोष्टी सहज उपलब्ध होणाऱ्या आणि अगदी हाकेच्या अंतरावर आहेत. पुणे हे पेशव्यांची राजधानी आहे,पुण्याला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे, पुणे हे नाटकांचे केंद्र आणि विद्येचे माहेरघर मानले जाते. याशिवाय पुणेरी पाटी हे पुणेकरांचे खास वैशिष्ट्य आहे, जे क्वचितच इतरत्र दिसते. पुणेकरांच्या सोयीसाठी येथील प्रत्येक नागरिक नेहमीच तत्पर असतात. याचेच उदाहरण देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

पुणेरी रिक्षाचालकाची भन्नाट कल्पना (Creative Idea by Pune Rickshaw Driver)

भर उन्हात फिरणाऱ्या पुणेकरांना काही क्षणाचा विसावा आणि गारवा मिळवा यासाठी एका रिक्षाचालकाने भन्नाट शक्कल लढवली आहे. उन्हापासून वाचण्यासाठी रिक्षाचालकाने आपली रिक्षाच पूर्ण हिरव्यागार गवताने सजवली आहे जे पुणेकरांचे लक्ष वेधून घेत आहे.

भर उन्हात गारवा देण्यासाठी हिरव्या गवताची सजावट (Green Grass Decoration to Beat Summer Heat)

उन्हाळा सुरु झाला आहे. सुर्याचा पारा चढतो आहे. त्यामुळे भर उन्हात पुणेकरांना कोणत्या ना कोणत्या कामानिमित्त घराबाहेर पडावे लागते. अशा परिस्थितीमध्ये उकाड्याने आणि तापलेल्या उन्हामुळे वैतागलेल्या पुणेकरांना काही क्षणाची विश्रांती आणि गरावा देण्यासाठी रिक्षाचालकाने स्वत:ची रिक्षाचे रूपच पालटले आहे. रिक्षाच्या संपूर्ण छतावर,आतून-बाहेरून, चहू बाजूने कृत्रिम गवताने सजवलेली आहे. त्यावर काही कृत्रिम फुलांनी सजावट केलेली आहे ज्यामुळे रिक्षाला पूर्णपुणे नवे रुप तर मिळालेच पण उन्हाच्या झळा काही अंशी कमी करण्याचा प्रयत्नही केला आहे. ग्राहकांना प्रवास करताना थोडासा गारवा मिळावा एवढीच काय ती रिक्षाचालकाही अपेक्षा असावी. या रिक्षाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोशल मीडियावर व्हिडीओ झाला व्हायरल (Video Goes Viral on Social Media)

इंस्टाग्रामवर ek_puneri नावाच्या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,”पुण्यातील रिक्षावाले काय करतील हे सांगू शकत नाही! भर उन्हात पुणेकरांच्या सेवेसाठी हिरवीगार रिक्षा” नेटकऱ्यांना हा व्हिडीओ आणि रिक्षा प्रचंड आवडली असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओला १६ हजारपेक्षा जास्त लोकांना आवडला आहे.

नेटकऱ्यांच्या मजेशीर प्रतिक्रिया (Funny Reactions from Netizens)

व्हिडीओवर नेटकऱ्यांनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहे. एकाने कमेंट केली की, पुणे तिथे काय उणे, दुसरा म्हणाला, छान आहे कल्पना.
तिसऱ्याने मजेशीर प्रतिक्रिया दिली की, “राणीच्या बाहेत बसल्यासारखं वाटतंय”