Viral video: सोशल मीडियावर रोज अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. तर अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे आपण पुन्हा पुन्हा पाहतो. सोशल मीडियावर सध्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच रील्स बनवत असतात. तुम्ही काका-काकुंना देखील भन्नाट गाण्यांवर भन्नाट डान्स करताना पाहिले असेल. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये पुणेरी काका-काकुंनी चंद्रा या मराठी गाण्यावर भन्नाट डान्स केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी व्हिडिओचा आनंद लुटला आहे.

पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात.‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. पण सध्या समोर आलेल्या व्हिडीओमध्ये पुणेकर काकांनी त्यांच्या डान्सने सगळ्यांनाच वेड लावलंय.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, चंद्रा गाणे सुरू आहे. बान नजरंतला घेऊनी अवतरली सुंदरा …चंद्रा रात रंगी रती रंगूनी …चंद्रा साज शिणगारही लेऊनी … चंद्रा सूरतालात मी दंगूनी … चंद्रा आले तारांगणी … चंद्रा या गाण्यावर काका काकू भन्नाट डान्स करत आहेत. सुरूवातीला काका-काकु मस्त तालामध्ये गोल फिरतात. मग गाणे चालू होताच काका डान्स करायला सुरूवात करतात. तर काकु त्यांच्याकडे बघत त्यांना कॉपी करत असतात. गाण्यांच्या बोलासोबत अगदी त्याला जुळतील अशा पद्धतीने डान्स स्टेप्स काका-काकू करत असतात. शेवट देखील भन्नाट आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ नक्की पाहा. हा व्हिडिओ तुम्हाला देखील नक्की आवडेल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> PHOTO: तुम्हीही सलूनमध्ये ‘फ्री हेड मसाज अन् मान मोडून घेताय? या तरुणाबरोबर जे घडलं ते पाहून पायाखालची जमीन सरकेल

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रीया

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इस्टाग्रामवर indianfestivalandevents या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. यावर अनेकांनी आपल्या भन्नाट प्रतिक्रीया दिल्या आहेत. एका युजरने म्हटले आहे की, ‘वाह पुणेकरांचा नाद नाय’ तर आणखी एकाने म्हटले आहे की, “मला वाटते काका-काकुंनी छान डान्स केला आहे, आयुष्य असं जगता आलं पाहिजे”. तसेच दुसऱ्या एका युजरने म्हटले आहे की, यांचा डान्स पाहून मलाही जान्स करायची इच्छा झाली. हा व्हिडीओ अनेकांनी रिपोस्ट देखील केला आहे.

Story img Loader