Puneri pati at Dagdusheth Halwai Ganpati 2024: मुंबई, पुण्यातसह राज्यभरात गणेशोत्सवाची धूम आणि एकच जल्लोष पाहायला मिळत आहे. अशातच घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपात लाडक्या बाप्पाचं आगमन झालं असून, बाप्पा थाटात विराजमान झाला आहे. पुण्यात मानाच्या गणपतीबरोबरच पुणेकरांचा लाडका बाप्पा म्हणजेच श्रीमंत दगडूशेठ गणपती. दगडूशेठ गणपती बाप्पाच्या दर्शनाला नेहमीच भाविकांची गर्दी असते आणि त्यात गणेशोत्सवात तर येथे दर्शनाला तुफान गर्दी असते. बाप्पाचं साजरं रूप पाहण्यासाठी भाविक गर्दी करताना दिसतात. यावेळी भाविक तासन् तास रांगेत उभे राहून बाप्पाच्या दर्शनाची आतुरतेनं वाट पाहत असतात. दरम्यान, काही असेही असतात की, जे ओळखीचा फायदा घेत, रांगेत उभं न राहता आतमध्ये जातात. अशा व्यक्तींमुळे जे तासन् तास रांगेत उभे असतात त्या भाविकांना दर्शनासाठी आणखी उशीर होतो.

अशाच भक्तांना पुणेकर तरुणानं पुणेरी शैलीत उत्तर दिलं आहे. हा तरुण दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर एक पाटी घेऊन उभा आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हीही हा व्हिडीओ पाहून सांगा तुम्हाला काय वाटतं?

Sarvajanik Ganesh Mandal Banner Goes Viral on Mahaprasad Will Be Given Only To Members netizens reacts
सार्वजनिक मंडळाचा ‘तो’ बॅनर पाहून लोक भडकले; PHOTO पाहून सांगा अशा मंडळांचं काय करायचं?
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
Puneri Aunty teach lesson to Bike Riders on Footpath Video Wins Hearts netizen love it
“पुणेकरांच्या नादाला लागू नये!”, पुलाच्या पदपथावर दुचाकी चालणार्‍यांना पुणेरी काकूंनी घडवली अद्दल, पाहा Viral Video
Puneri pati viral for parking in his spot funny puneri pati goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गेट समोर गाडी पार्क करणाऱ्यांना आकर्षक बक्षिसे; शेवटचं बक्षिस वाचून पोट धरुन हसाल
Pune shop owner advertise for Renting shop in Puneri way puneri poster goes viral
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! गाळा भाड्यानं देण्यासाठी दुकानाबाहेर लावली जाहिरात; वाचून पोट धरुन हसाल
Man wrote message for his wife in back of the car video goes viral
किती ते प्रेम! नवऱ्यानं बायकोसाठी कारच्या मागे लिहला खास मेसेज; रस्त्यावर सर्व बघतच राहिले, VIDEO पाहून कराल कौतुक
Puneri pati on Doorbell goes viral on social media funny puneri pati
PHOTO: पुणेकरांचा नाद नाय! घरी येणाऱ्या पाहुण्यांसाठी दरवाजावर लावलेली पाटी पाहून पोट धरुन हसाल

काय लिहलंय पाटीवर ?

पुण्यात दगडूशेठ गणपती बाप्पाच्या मंदिराबाहेर हातात पाटी धरून उभ्या राहिलेल्या या तरुणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तुम्ही म्हणाल की, या पाटीवर असं लिहिलंय तरी काय? तर या पाटीवर “ओळखीनं याल, तर मूर्ती दिसेल; रांगेतून जाल, तर देव भेटेल -एक पुणेकर” असा आशय लिहिलेला आहे. बऱ्याचदा ओळखीनं लोक थेट मूर्तीपर्यंत पोहोचतात. मात्र, अशा वेळी तुम्हाला मूर्ती तर दिसेल; पण चुकीच्या मार्गानं आल्यामुळे देव मात्र भेटणार नाही, असं सांगण्याचा प्रयत्न या तरुणानं केला आहे. बाप्पाच्या सेवेसाठी असलेले कार्यकर्ते बऱ्याचदा आपल्या ओळखीच्या लोकांना थेट आतमध्ये प्रवेश देतात. यावेळी रांगेत असलेल्या लोकांना ताटकळत उभं राहावं लागतं.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> लालबागला जाताय? VIP लाईनमध्येच हे हाल तर सर्वसामान्यांचं काय; दर्शनाला जाण्याआधी ‘हा’ VIDEO नक्की बघा

सोशल मीडियावर हा व्हिडीओ aashishborole नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आह. “गणेश उत्सवासाठी खास पुणेरी पाटी..या व्हिडीओमागे कुठलाही वैयक्तिक व धार्मिक भावना दुखावणार असा आमचा हेतू नाही, कोणीही गैरसमज मानू नये.” असं कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. नेटकरी या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय “हा खरा पुणेकर” तर आणखी काही नेटकऱ्यांनी या पाटीवर सहमती दर्शवली आहे.