Puneri poster viral: सोशल मीडिया हे माहितीचं भांडार आहे. इथे अशा काही गोष्टी पाहायला किंवा ऐकायला मिळतात की, कधी कधी त्यामुळे धक्काच बसतो, तर कधी कधी इथे मीम मटेरीयलदेखील व्हायरल होतं; ज्याला कधी लोक डोक्यावर घेतात, तर कधी ट्रोल करतात. तसेच हल्ली ज्या पाट्या आपण पुण्यात पाहतो, त्याच पाट्या सगळीकडे पाहायला मिळतात. अशीच एक पाटी घेऊन तरुण भरचौकात उभा आहे. ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, ती पाहून तुम्हीही पोट धरून हसाल. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशाच एका पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. मात्र, ही पाटी पुण्यातली नसली तरी यावर लिहिलेला आशय हा नक्कीच पुणेकरानं लिहिला असावा, असं म्हणाल.

“पाऊस आणि बायको फक्त सुरुवातीलाच…”

Puneri Pati Puneri Poster Goes Viral On Social Media
Photo: आतापर्यंतची सगळ्यात भारी पुणेरी पाटी! ‘या’ ओळी विचार करायला भाग पाडतील; एकदा पाहाच
video having fun with the kids under the waterfall suddenly the water level rose and the picture changed shocking video goes viral
लोणावळ्याची घटना ताजी असतानाच आणखी एक VIDEO समोर; काही सेंकदांत घेतलेल्या निर्णयामुळे असा बचावला चिमुकला
Puneri Patya Viral Puneri Pati
“जीवन खूप सुंदर आहे फक्त सासरा…” ही पुणेरी पाटी पाहून पोट दुखेपर्यंत हसाल; PHOTO एकदा पाहाच
Young girl photoshoot on dam and she fell in dam water shocking video
VIDEO: जीव एवढा स्वस्त असतो का? रीलच्या नादात होत्याचं नव्हतं झालं; पाण्याच्या प्रवाहात तरुणी क्षणात दिसेनाशी झाली
Puneri Pati In Rickshaw For Couples funny Photo goes Viral
PHOTO: “नमस्कार मी पुणेकर, कृपया जोडप्यांनी…” पुण्यातल्या रिक्षातली भन्नाट पाटी व्हायरल; वाचून पोट धरुन हसाल
Man Wrote Message For His Wife In Back Of The Car Video Goes Viral
Photo: याला म्हणतात वडिलांचा धाक! तरुणानं गाडीच्या मागे लिहलं असं काही की पोट धरुन हसाल
Bees attacked on women who had gone for vatpaurnima in Nive village of Poladpur taluka
रायगडात वटपूजन करताना अघटित घडले… जाणून घ्या काय आहे प्रकार…
riteish deshmukh greets madhuri dixit
Video : अंबानींच्या समारंभात माधुरी दीक्षितला पाहताच रितेश देशमुखने केलं असं काही…; अभिनेत्याचं सर्वत्र होतंय कौतुक

अनेक वेळा आपण पाहतो की, अशा पाट्या वरचेवर व्हायरल होत असतात. त्यावर लिहिलेला आशय वाचून अनेकदा हसू आवरत नाही. अशीच पाटी पुन्हा एकदा व्हायरल होत आहे. ही पाटी पाहून रस्त्यावर येणारे जाणारे लोक पाटी पाहून थांबत आहेत. इतकंच नाही तर तिथे उपस्थित असलेले पुरुष आणि एक पोलीसही तरुणानं धरलेल्या पोस्टरकडे बघत राहिले. तर काही लोक हे पोस्टर वाचून हसताना दिसत आहेत. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहिलं आहे या पोस्टरवर? तर या पाटीवर “पाऊस आणि बायको सुरुवातीलाच चांगले वाटतात. त्यानंतर नुसती कीच कीच कीच” असा मनोरंजनात्मक आशय लिहिला आहे.

पुणेरी स्टाईल पाटी व्हायरल

पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. कधी वाद तयार करतात, तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात, तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. व्यक्त न होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. या पुणेरी पाटीचा वापर आता पुण्याबाहेरचे लोकही करायला लागले आहेत.

पाहा पाटी

हेही वाचा >> चक्क चोरांनी दाखवली माणुसकी; मुलगा रडायला लागताच चोरीचं सामान केलं परत, VIDEO पाहून पोट धरुन हसाल

हा व्हिडीओ poppervishalofficial नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. दरम्यान, या व्हिडीओमुळे तो ट्रोलही झाला आहे. अनाबिया अन्सारी नावाच्या महिलेनं विशालला चांगलंच सुनावलं आहे. कमेंटमध्ये तिनं म्हटलं, “पाऊस आणि पत्नी या दोघांशिवाय तुम्हाला वंध्यत्व येईल.”