Puneri pati : पुणे म्हटलं की, पुणेरी पाट्या लक्षात येतातच पुणेरी पाट्या या अनेकदा चर्चेचा विषय बनतात. त्या कधी वाद तयार करतात, तर कधी वादावर भाष्य करतात. कधी चांगला संदेश देतात, तर कधी चांगलाच संदेश पोहोचवतात. अशीच एक पुणेरी पाटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. व्यक्त न होता आपली मतं ठामपणे आणि थेट मांडण्याचं पुणेकरांचं माध्यम म्हणजे पुणेरी पाटी. पुणेकर त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण तिरकस स्वभावासाठी नेहमी ओळखले जातात. त्यात पुणेकरांच्या पुणेरी पाट्या या नेहमी चर्चेच्या विषय ठरतात. पुणेरी किस्से आणि पुणेरी पाट्या जगजाहीर आहेत. अशातच एक काका लिहीत असणाऱ्या पुणेरी पाटीची चर्चा सध्या सगळीकडे जोरात सुरू आहे. ही पाटी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पाटी वाचून तुम्हीही पोट धरून हसाल.

इस्रायल-अमेरिका आणि ईराण यांच्यातील युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे हॉटोल आणि फूड इंड्रस्टीला मोठा फटका बसला आहे. अनेक स्ट्रीट फूड व्यवसाय बंद झाले आहे. हॉटेल्स बंद झाले आहे. तर काही ठिकाणी खाण्याच्या किमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. याच दरम्यान एका पुणेरी पाटीने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. एका पुणेकराने गॅस टंचाईवर पुणेरी टोला लगावला आहे. सध्या सोशल मीडियावर एक पुणेरी पाटी व्हायरल होत आहे. युद्धामुळे भारतात गॅस तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे अनेक छोटे चहाचे स्टॉल बंद झाले आहे. यावर एका चहाच्या स्टॉलवाल्याने लोकांना एक दिलदार ऑफर दिली आहे. एका मीनाक्षी नावाच्या टी-स्टॉल वाल्याने एक खास पाटी लावली आहे.यामध्ये तो फुकटात चहा देणार आहे मात्र त्यानं एक अट ठेवली आहे. ही अट वाचून तुम्हीही पोट धरुन हसाल एवढं नक्की.

 आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, पाटीवर असं लिहिलंय तरी काय? या पाटीवर लिहिले आहे, “प्रिय ग्राहक, गॅसची टाकी द्या आणि युद्धसंपेपर्यंत फुकटात चहा प्या. यावर एकही टीपही देण्यात आली आहे. गॅस टाकी फुकट घेणार नाही, त्याचे पैसेही दिले जातील.”

पाहा व्हिडीओ

‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल, तर येथे प्रवेश नाही’ अशा इशार्‍यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले, तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे, असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरागबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही, तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.