Pune poster viral: हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःच घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. लग्नासाठी उभं राहणार्‍या मुली सरकारी नोकरी करणार्‍या मुलांना प्राधान्य देतायेत. सरकारी नोकरी करणारा नवराचं बरा असं या मुलींना वाटतंय.आज ज्या मुलांकडे सरकारी नोकरी आहेत अशा मुलांना मोठी मागणी आहे. पूर्वी ज्याप्रमाणे सेफ नोकरी म्हणून बघितलं जायचं, तशीच परिस्थिती आता पुन्हा निर्माण झाली आहे. मात्र यामुळे लग्नासाठी मुलगी मिळत नाही म्हणून तरुणांचे मानसिक खच्चीकरण होऊ लागले आहेत. परिणामी मुलांचे कुटुंबीय सुद्धा आज मानसिक ताणात अडकलेले आहेत.

दरम्यान अशा दरम्यान असाच एक वैतागलेला तरुण पोस्टर घेऊन थेट चौकात पोहचला आहे. या पोस्टरवर असं काही लिहलंय की सरकारी नोकरीवालाच मुलगा हवा म्हणणाऱ्या मुलींना चांगलीच चपराक बसणार आहे.

या तरुणानं सरकारी नोकरीवाला मुलगा हवा असा हट्ट करणाऱ्या पालकांना आणि मुलीला चांगलंच फटकारलं आहे. आता तुम्ही म्हणाल असं काय लिहलंय या पोस्टरवर ? तर या तरुणानं या पोस्टरवर सरकारी शाळा नको,” सरकारी बस नको, सरकारी दवाखाना नको पण नवरा मात्र सरकारी नोकरीवाला पाहिजे” असा टोला लिहला आहे. ज्या सरकारी बसमधून प्रवास करायला सरकारी दवाखान्यात उपचार घ्यायला आणि आपल्या मुलांना सरकारी शाळेत घालायचं नसतं तेच नवरा किंवा जावई मात्र सरकारी नोकरीवालाच हवा असा आग्रह धरतात.

पाहा पोस्टर

हेही वाचा >> Photo: “स्वत:ला पुण्यात फ्लॅट घ्यायला ६० वर्ष लागली अन् जावई…” तरुणानं प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना दिलं चोख उत्तर

जो तरुण पुण्यामुंबई सारख्या शहरात नोकरीला आहे .अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असं लोकांना वाटू लागले आहे.सध्याची लग्नसंस्था पैशाभोवती फिरणारी मागील काही दिवसांत तरुणांना मुलगी मिळण्याचे वास्तव भयानक झाल्यामुळे काही लोकांनी मुलींच्या कुटुंबियांना पैसे देण्याची प्रथा सुरू केली आहे. ही प्रथा आजही खेड्यापाड्यात सर्रासपणे सुरू आहे. ही बाब तरुणांसाठी जास्तच त्रासदायक ठरत आहे.विवाहाची जबाबदारी पडण्यापूर्वी करिअर घडविणे हल्लीच्या मुलामुलींना योग्य वाटते. मग शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षांच्या नादात त्यांच्याही नकळत विवाहयोग्य वय वाढत जाते. नोकरी मिळाल्यानंतरही तीत स्थैर्य हवे अशा अपेक्षेने काही मुले स्वतःच उशिरा बोहल्यावर चढतात.