Puneri pati viral: विनोदी नावांच्या पाट्या म्हटले तर पुणेरी पाट्यांचे नाव सर्वात पहिले डोळ्यांसमोर येते. या पाट्यांतून पुणेकरांची चतूरता, त्यांची क्रिएटीव्हीटी, त्यांचे भाषाज्ञान तसेच त्यांचे व्यक्तीमत्व लक्षात येते. अनेक वेळा काही पाट्या वैतागून, उर्मठपणानेही लिहिलेल्या आढळतात. मात्र कशाही असल्यातर ह्या पाट्या मात्र खुपच फनी असतात. संपूर्ण राज्यात प्रसिद्ध असलेल्या आणि पुणेकरांच्या हजरजबाबीपणाची पावती देणाऱ्या पुणेरी पाट्या आजही आवडीने वाचल्या जातात. याच स्वरूपातील एक पुणेरी पाटी सोशल मीडियावर हिट झाली आहे. . कुणाच्याही नादाला लागा पण पुणेकरांच्या नादाला लागू नका असं म्हंटलं जातं. याचीच प्रचिती देणारी ही पाटी आहे. पुणेरी दणका भल्या सकाळी व्यायामाच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या पुणेकरांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातील काही जण चक्क फळाफुलांची चोरी करतात. यावर आळा घालण्यासाठी लावण्यात आलेली ही पाटी सध्या चर्चेत आहे. लोकांच्या दारात लावलेल्या झाडांच्या फुलांवर डल्ला मारला जातो. रोज सकाळी न चुकता घरच्या देवांसाठी म्हणून ही फुलं तोडली जातात. याविषयी कोणी हटकले तर असू दे की देवासाठी तर नेतोय असे उत्तर दिले जाते. विशेष म्हणजे फुलं तोडण्यापासून कोणाला हटकले तर भल्या सकाळी भांडण नाही होत असल्याचे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. याच लोकांनी पुणेरी पाटी लावत चांगलाच दणका दिलाय. फुलं चोरणाऱ्यांना घडवली जन्माची अद्दल पुणेरी पाटय़ा म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी तैलबुद्धीतून पाटय़ांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते. आपण अनेकदा पाहिलं असेल खास करुन पुण्यात घराबाहेर वेगवेगळ्या पाट्या लावलेल्या असतात, अशीच एक पाटी पुण्यात एका घराबाहेर लावली होती. या पाटीवर आजोबांनी “कृपया कळ्या तोडू नका, फुल उमलल्यावर चोरून न्या. कारण हे झाड फुकट्यांसाठीच लावलं आहे.” असा आशय लिहला आहे. पुणेकर त्यांच्या वैशिष्टपूर्ण तिरकस स्वभावासाठी का ओळखले जातात हे याचं उदाहरण आहे. पाहा व्हिडीओ हेही वाचा >> पाचव्या मजल्यावरून कुत्रा खाली पडला अन् चिमुकलीचा जीवच गेला! सीसीटीव्ही VIDEO पाहून कळेल नेमकं काय घडलं? ‘तुम्हाला प्रत्येक विषयात स्वत:चे मत नसेल तर येथे प्रवेश नाही’, अशा इशार्यापासून ते ‘पगडीखालची खरी बुद्धिमत्ता काय असते हे पाहायचंय?’ असे आव्हान फक्त एकाच शहरात दिले जाऊ शकते, ते म्हणजे पुणे. सुरुवातीला पेठांमध्येच असलेली पुणेरी पाटी शहर पसरले तशी संपूर्ण पुण्यात पसरली. कमीत कमी शब्दांत समोरच्याचा जास्तीत जास्त अपमान करण्याची कला पुणेकरांनाच साधली आहे असे म्हणतात. त्याचप्रमाणे कमीत कमी शब्दांत जास्तीत जास्त खवचट आशय व्यक्त करणारी पुणेरी पाटीही कोणी येरा गबाळा बनवू शकत नाही. पुणेरी पाट्या म्हणजे पुणेकरांसाठी अभिमानाचा वारसा. केवळ बुद्धिमत्ता नाही तर खास पुणेरी बुद्धीतून पाट्यांच्या माध्यमातून पुणेकरांचा स्पष्टवक्तेपणा आणि थेट भिडण्याची वृत्ती झळकते.