Viral Video Pune : पुणे आणि पुणेकरांची जगभर चर्चा होत असते. कधी पुणेरी पाट्या चर्चेत असतात, कधी पुण्यातील रिक्षाचालक तर कधी पुणेरी लोक. आपल्या हटके शैलीमुळे पुणेकर नेहमी चर्चेत असतात. सध्या अशाच एका पुणेरी काकांचा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चा होत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये काकांनी दुचाकीवर प्रवास करताना छत्री ठेवण्यासाठी हटके जुगाड वापरला आहे जो पाहून अनेकांना आश्चर्य वाटत आहे. पुण्यात अशा गोष्टी पाहायला मिळणे ही पुणेकरांसाठी काही नवीन गोष्ट नाही. काकांचा जुगाड पाहून अनेकांना हसू येत आहे.

पुण्यात सध्या कधी पाऊस पडले याचा नेम नाही त्यामुळे पुणेकरांना रोज छत्री बरोबर घेऊनच घराबाहेर पडावे लागते. पण दुचाकीवर प्रवास करताना छत्री वापरता येत नाही आणि उगाच सांभाळावी लागते. अशी काहीशी अवस्था या पुणेरी काकांची देखील झाली असावी त्यामुळे त्यांनी आपला सोपा जुगाड शोधून काढला.

uncle dance so gracefully
काकांनी केला अप्रतिम डान्स, चेहऱ्यावरील हावभाव अन् डान्स स्टेप्स एकदा पाहाच, VIDEO होतोय व्हायरल
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
a young guy holding paati in hand wrote amazing message who burst so many firecrackers in Diwali
Video : “दिवाळीत फटाके तेवढेच फोडा…”; तरुणाने सुनावले खडे बोल, पाटी होतेय व्हायरल
The young man suddenly got dizzy in the metro only mother came to help
मेट्रोमध्ये तरुण अचानक चक्कर येऊन पडला, शेवटी आईच धावून आली, पाहा Viral Video
Bigg Boss Marathi fame Ankita walawalkar fish gift to Dhananjay powar for bhaubij
Video: ‘बिग बॉस मराठी’ फेम अंकिता वालावलकरने भाऊबीजनिमित्ताने धनंजय पोवारला दिलं हटके गिफ्ट, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “वहिनीला…”
Indian jugad To Stop Footwear Theft In The Temple Use This Unique Trick Desi Jugaad Video
VIDEO: मंदिरात किंवा गर्दीच्या ठिकाणी तुमचीही चप्पल चोरीला जाते का? मग हा जुगाड कराच, कधीच चप्पल चोरी होणार नाही
Man Ask Auto Riksha Driver Dog drop him to Panve
VIRAL VIDEO : दादा, पनवेलला सोडाल का? श्वान बनला रिक्षाचालक; तरुणाने गंमत करताच पाहा कसे दिले एक्स्प्रेशन
students revealing the contents of their lunch boxes
Viral Video: ‘जिलेबी देणाऱ्या आईला भेटायचंय…’ चिमुकल्यांच्या डब्यातील पदार्थ पाहून तुम्हीही व्हाल थक्क; म्हणाल, ‘आमच्या वेळी…

पुणेरी काकांचा हटके जुगाड

दुचाकीवर मागच्या सीटवर बसलेल्या काकांनी चक्क आपल्या शर्टच्या कॉलरला छत्री अडकवली आहे. अशा अनपेक्षित गोष्टी फक्त पुण्यातच पाहायला मिळतात त्यामुळे पुणेरी काकांचा हटके जुगाड पाहून कोणीतरी काकांचा व्हिडिओ शुट करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. अनेकांना वाटेल की एवढं काय यात चर्चा करण्यासारखं? पण हीच तर गंमत आहे. हा पुण्याचा मॅनेजमेंटचा इश्यू आहे जी फक्त पुणेकरांना कळते. मग ती पुणेरी पाटी असो किंवा पुणेरी जुगाड.

हेही वाचा –Video : चूक कोणाची? कामाचे तास संपल्याने पायटलचा टेक ऑफसाठी नकार! पुणे-बंगळुरू इंडिगो फ्लाइला ५ तास उशीर; प्रवाशांचे हाल

येथे पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा – “ससा तो ससा की कापूस जसा, त्याने कासवाशी पैज लाविली…”, गोष्ट नव्हे प्रत्यक्षात रंगली शर्यत; कोण जिंकले ते पाहा Viral Videoमध्ये

नेटकऱ्यांना आवडला काकांचा जुगाड

व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर ek_number_punekar नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “वाढीव आमचे पुणे”
तसेच स्थळ – “पुणे, नाद करा ओ पण पुणेकरांचा कुठे”असा मजकूरही व्हिडीओवर लिहिलेला दिसत आहे. व्हायरल व्हिडीओवर काहींनी कमेंटही केल्या आहेत.

व्हिडीओवर कमेंट करत एकाने सांगितले की, “हा काही नवीन जुगाड नाही, जुनी लोक अशीच छत्री कॉलरला अडकवून फिरत असे”

काहींनी खळखळून हसण्याचे इमोजी व्हिडीओवर कमेंट करताना पोस्ट केल्या आहेत.