scorecardresearch

गाय पाण्यातून चालली होती, अचानक करंट लागून तडफडत जमिनीवर कोसळली आणि मग… पाहा VIRAL VIDEO

पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी…! अगदी असंच काहीसं या गायीसोबत घडलंय.

Cow-Saved-Mansa-Video-Viral
(Photo: Twitter/ akhilnaithani )

सध्या पावसाचा हंगाम सुरू झाला आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाला सुरूवात देखील झाली आहे. दरम्यान पावसाळ्याच्या दिवसात अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे विविध दुर्घटना घडतात. त्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण होतो. याबाबत माणसांनी खबरदारी घेतली तरी कधी कधी मुके प्राणी या घटनांचे बळी ठरतात. अशीच एक घटना घडली आहे. पाण्यातून चालत असलेल्या गायीला अचानक विजेचा धक्का बसल्याची घटना घडली आहे. यात ती तडफडत जमिनीवर कोसळली. पण म्हणतात ना, देव तारी त्याला कोण मारी…! अगदी असंच काहीसं या गायीसोबत घडलंय.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, रस्त्यावर सगळीकडेच पावसाचं पाणी साचलं आहे. त्यातून कशीबशी वाट काढत ही गाय चालताना दिसून येतेय. समोर एक विजेचा खांब देखील दिसून येतोय. ही गाय विजेच्या खांबाजवळ येताच तिला करंट लागतो आणि यात ती तडफडत जमिनीवर कोसळल्याचं दिसून येतेय. लागोपाठ विजेचा करंट लागून ही गाय सुरूवातीला आपली पाय आपटताना दिसून येतेय, इथून तिथे हलण्याचा प्रयत्न करतेय, शेवटी ती करंट लागून कोसळून खाली पडते. त्याचवेळी तिथे उभा असलेला एक दुकानदार हे सगळं पाहतो आणि तिच्या मदतीला धावतो.

आणखी वाचा : देसी ढोलाच्या तालावर थिरकले विदेशी नागरिक, जबरदस्त डान्सचा हा VIRAL VIDEO पाहा

विजेच्या धक्क्याने तडफडत ही गाय खाली पडलेली असताना हा दुकानदार आपल्या जीवाची पर्वा न करता पाण्यात उतरतो. एक कपडा तो गायीच्या पायाला बांधतो. हे पाहून मागून येत असलेला आणखी एक मुलगा त्याच्या मदतीला पुढे येतो. कपड्याच्या मदतीने ते दोघे गायीला पाण्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. हे पाहून आणखी एक तिसरा त्यांच्या मदतीला पुढे येतो. यावेळी गाय सुद्धा तिला वाचवणाऱ्या व्यक्तींकडे पाहताना दिसून येतेय. जणू काही तिचा जीव वाचवल्याबद्दल ती आभार मानत असावी. विजेच्या खांबापासून गायीला दूर केल्यानंतर ही गाय पुन्हा कशीबशी उठण्याचा प्रयत्न करते. आपल्या चारही पायांवर ही गाय पुन्हा पहिल्यासारखी चालत निघून जाते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : वर्षभर शिकवून मुलाला गणितात इतके गुण मिळाले की पाहून वडील ढसाढसा रडले!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : VIRAL VIDEO : धाडसी पोलीस अधिकाऱ्याने जीवाची पर्वा न करता दलदलीत अडकलेल्या माणसाचा जीव वाचवला!

हा व्हिडीओ ‘राईटी नॉट लेफ्टी’ नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल देखील झाला. ही घटना पंजाबमधील मासना जिल्ह्यात घडली आहे. लोक या दुकानदाराने दाखवलेल्या माणूसकीचं कौतुक करताना दिसून येत आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Punjab man saved cow from getting electrocuted in mansa video goes viral prp